Maharashtra Rain Traffic Alert 5 Apps: राज्यात मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसह अनेक प्रमुख महामार्ग आणि घाटांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, आता अशा आणीबाणीच्या परिस्थितीत रस्त्यावर अडकून पडण्यापेक्षा तंत्रज्ञानाची मदत घेणे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि प्रवाशांमध्ये प्रचलित असलेली 5 विशेष ॲप्स तुम्हाला रस्त्याची सद्यस्थिती थेट मोबाईलवर दाखवतील.

आता तुम्हाला 5 विशेष ॲप्स तुम्हाला रस्त्याची सद्यस्थिती थेट मोबाईलवर दाखवतील, आता हे कोणते ॲप्स, टूल्स आहेत, जाणून घेऊया.
1. महाराष्ट्र हायवे पोलीस सोशल रडार (Official @HighwayPoliceMA)
महामार्ग पोलिसांचे अधिकृत ‘X’ आणि फेसबुक हँडल हे सर्वात खात्रीशीर माध्यम आहे. मुंबई-पुणे, मुंबई-गोवा किंवा नाशिक महामार्गावर दरड कोसळल्यास किंवा रस्ता बंद केल्यास पोलीस येथे दर मिनिटाला थेट फोटो आणि व्हिडिओसह अधिकृत अपडेट्स देतात.
2. गुगल मॅप्सचे लाइव्ह ट्रॅफिक इंडिकेटर
हे सर्वाधिक प्रचलित ॲप महामार्गावरील लाल रंगाच्या पट्ट्यांद्वारे ट्रॅफिक जॅमची तीव्रता दाखवते. रस्ता पूर्णपणे ठप्प असल्यास गुगल मॅप्स आपोआप ‘रोड क्लोजर’ चा आयकॉन दाखवतो आणि प्रवाशांना मुख्य हायवे सोडून सुरक्षित अंतर्गत पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देतो.
3. Waze App
प्रवाशांमध्ये वेगाने लोकप्रिय होणारे हे ॲप थेट रस्त्यावरील ड्रायव्हर्सच्या डेटावर काम करते. महामार्गावर पुढे चाललेल्या गाड्यांचा अचूक वेग किती आहे, पाऊस किती तीव्र आहे आणि नेमका ट्रॅफिक जॅम कुठे सुरू झालाय, याची माहिती रस्त्यावरील लोकच यात लाईव्ह अपडेट करत असतात.
4. My FASTag App
महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहनांचा किती दाब आहे, हे जाणून घेण्यासाठी या अधिकृत ॲपची मदत होते. खालापूर, तळेगाव किंवा इतर प्रमुख टोल प्लाझावरील फास्टॅग स्कॅनिंगच्या गतीवरून एक्सप्रेसवे चालू आहे की वाहने थांबली आहेत, याचा अचूक अंदाज प्रवाशांना येतो.
5. WhatsApp/Call – 98224 98224
महामार्ग पोलिसांचा हा अधिकृत डिजिटल क्रमांक प्रवाशांसाठी संकटमोचक ठरत आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करून किंवा कॉल करून घाटातील हवामान आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत का, याची खात्रीशीर माहिती प्रवाशांना घरबसल्या मिळते.

