Headlines

मेघना पंत यांचा कॉलम:मार्ग वेगवेगळे झाले याचा अर्थ मनांतही अंतर असावे असा होत नाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎




जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नी‎आणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवास‎करताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.‎काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्र‎वाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचित‎आपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत.‎ आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहत‎आहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासून‎सामान्य आहे, पण भारतात ती अजूनही संशयाने पाहिली‎जाते. आपल्याकडे लग्नाला पवित्र मानले जाते,‎घटस्फोटाला अजूनही कलंक मानले जाते आणि कौटुंबिक‎न्यायालयात अशा वादांची गर्दी असते, जे अनेकदा‎लग्नापेक्षाही जास्त काळ चालतात. भारतात घटस्फोटाला‎पिढ्यान‌्पिढ्या एका युद्धासारखे सादर केले गेले. त्यात एक‎खलनायक आणि एक पीडित असणे आवश्यक होते. कुटुंबे‎दोन गटांत विभागली जात. मुले या सर्वांचा सर्वाधिक‎फटका सोसत असत. घटस्फोटित पती-पत्नी एकमेकांच्या‎आयुष्यातून पूर्णपणे गायब होत, केवळ वकील आणि‎न्यायालयाच्या आदेशांमार्फत त्यांचा संपर्क उरत असे. पण‎आता एक शांत बदल सुरू होत आहे.‎ आमिर खान आणि किरण राव यांनी वारंवार या गोष्टीवर भर‎दिला आहे की, जरी त्यांचे लग्न संपले असले तरी त्यांचे‎कुटुंब संपलेले नाही. हृतिक रोशन आणि सुझैन खान‎यांनीही घटस्फोटानंतर यशस्वी संयुक्त पालकत्वाचे‎कदाचित भारतातील सर्वात मोठे उदाहरण मांडले आहे. ते‎कौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र सहभागी होतात, महत्त्वाचे‎सण-उत्सव सोबत साजरे करतात. त्यांनी आपल्या मुलांच्या‎हिताला स्वतःच्या अहंकारापेक्षा वर ठेवण्याचा एक‎जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे दिसते. हे महत्त्वाचे आहे‎कारण सेलिब्रिटी केवळ आपले मनोरंजन करत नाहीत, तर‎ते शक्यतेची एक नवी दिशाही दाखवतात.‎ अशा देशात जिथे घटस्फोटित स्त्रियांना अजूनही विचारले‎जाते की ‘काय चुकले होते?’ आणि जिथे घटस्फोटित‎पुरुषांना स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्यास प्रोत्साहित केले‎जाते, तिथे घटस्फोटित पती-पत्नीला सार्वजनिक कटुता न‎ठेवता एकत्र पाहणे हे खोलवर रुजलेल्या धारणांना आव्हान‎देते. हे सूचित करते की घटस्फोट नेहमीच अपयश नसतो.‎अनेकदा हे केवळ आयुष्यातील एक बदल असते.‎ अर्थात, सेलिब्रिटींचे आयुष्य हे आदर्श मानून चालणार‎नाही. आर्थिक समृद्धी अनेक गोष्टी सोप्या करते. आया,‎समुपदेशक, एकापेक्षा जास्त घरे, लवचिक दिनचर्या आणि‎आर्थिक सुरक्षा यामुळे ते ताण कमी होऊ शकतात, ज्यांचा‎सामना सामान्य कुटुंबांना करावा लागतो. तरीही हे तत्त्व‎महत्त्वाचे आहे.‎ प्रश्न असा नाही की दोन व्यक्ती आयुष्यभर विवाहित राहू‎शकतात का? प्रश्न हा आहे की, लग्न संपल्यानंतरही त्या‎एकमेकांबद्दल आदर आणि सद्भावना ठेवू शकतात का?‎मुले या प्रक्रियेत असतात, तेव्हा हे अधिक महत्त्वाचे ठरते.‎जगभरातील संशोधन सांगते की, पालकांमधील दीर्घकाळ‎चालणाऱ्या संघर्षाचा मुलांना अधिक त्रास होतो. दोन शांत‎घरांच्या दरम्यान राहणारे मूल, एकाच तणावपूर्ण घरात‎अडकलेल्या मुलापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असते.‎ देश बदलत आहे. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होत‎आहेत. लोक उशिरा लग्न करत आहेत. लग्नाकडून‎असणाऱ्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकच‎घटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, वर‎दिलेले प्रसंग एक पर्यायी कथा मांडतात, ज्यामध्ये‎घटस्फोटित पती-पत्नी एकमेकांचे सहकारी बनून राहू‎शकतात आणि मुलांना कुणा एकाची बाजू घेण्यास भाग‎पाडले जात नाही.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत