Kangana Ranaut slams actress who married to Muslim:अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नीट आंदोलनात सहभागी झालेल्या जेन झी विद्यार्थ्यांना तिनं जनरेशन गटार असं म्हटलं होतं.

कंगना रणौत नेमकं काय म्हणाली?
मी चित्रपटसृष्टीतील अनेक हिंदू मुलींना जवळून पाहिलं, माझी त्यांच्यासोबत चांगली ओळखही आहे. त्या हिंदू असतात, पण सुरुवातीला त्यांचा राजकारणाशी किंवा विशिष्ट विचारसरणीशी काही संबंध नसतो. त्या बहुदा तटस्थ असतात. पण जसं त्या मुस्लिम/इस्लामिक व्यक्तीच्या संपर्कात येतात त्यांचे विचार बदलायला लागतात. एखाद्या मुस्लिममुलासोबत लग्न झाल्यानंतर त्यांची विचारसरणी अचानक हिंदू विरोधी होते, एका वर्गाकडे झुकते आणि त्या डाव्या विचारसरणीकडे वळतात, असं कंगना म्हणाली.
Om Puri : ‘त्यांचं मोलकरणीसोबत अफेअर होतं, तरी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला’, ओम पुरींबद्दल एक्स पत्नीचा दावा; म्हणाली, ‘खूप उशीर झालेला’
तसंच पुढं बोलताना तिनं स्पष्ट केलं की, देशाचे संविधान प्रत्येकाला कोणताही धर्म किंवा विचारसरणी स्वीकारण्याचे स्वातंत्र्य देते, त्यामुळं कोणाच्या विचारांवर तिचा आक्षेप नाही. मात्र, जेव्हा लोक तिच्या स्वतःच्या अध्यात्मिक व राजकीय प्रवासावर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा त्यांना खटकतं, हे सांगताना तिनं हा मुद्दा मांडला आहे.
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात येतात, लग्न करतात आणि अचानक कट्टर डाव्या विचारसणीच्या होतात. लग्नापूर्वी राजकारणाबद्दल त्या काहीच बोलत नाहीत. पण, इस्लामी लोकांच्या संपर्कात येताच त्या कट्टर डाव्या होतात. मग मी ‘संघी’ का होऊ नये? असंही ती म्हणाली.
Subodh Bhave on Sai Tamhankar:’ती इंडस्ट्रीत कितपत टिकेल मला शंका होती, पण आता तिचं कौतुक वाटतं’ सई ताम्हणकरबद्दल भरभरून बोलला सुबोध भावे
कपड्यांवरून अन् बोलण्याच्या शैलीवरून टोला
एवढ्यावरच न थांबता कंगनानं एका अभिनेत्रीच्या कपड्यांच्या आणि बोलण्याच्या पद्धतीवरही निशाणा साधला.एक अभिनेत्री सध्या पॉकेटमारासारखे कपडे घालते आणि बोलते, असं सांगत कंगनानं तिच्या सध्याच्या शैलीवर टीका केली.
Amol Kolhe: मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम, पण इंडस्ट्रीतील लोकांकडून दबक्या आवाजात कौतुक; ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ संदर्भात अमोल कोल्हेंचा आणखी एक मोठा निर्णय
“तुमचा पार्टनर तुम्हाला एखाद्या पाकीटचोरासारखे फिल करायला लावत असेल, तर मला वाईट वाटतं. पूर्वी तू अतिशय सुंदर आणि शोभून दिसायची, आता काय झालं? असा सवालही तिनं विचारला.
ती अभिनेत्री कोण?
कंगनाने या व्हिडिओमध्ये कोणत्याही अभिनेत्रीचं नाव थेट घेतलेलं नाही. मात्र, जून २०२४ मध्ये अभिनेता झहीर इक्बालशी लग्न झालेल्या सोनाक्षी सिन्हानं नीट आंदोलवरही सरकार विरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळं सोनाक्षीच कंगनाच्या या टीकेचं मुख्य लक्ष्य असावी, असं म्हटलं जातंय.तर कंगनाचा रोख स्वरा भास्करकडेही असू शकतो, असंही अनेकांनी म्हटलंय.
Kangana Ranaut on Gen Z:’जनरेशन गटार’; मद्यपान, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध; कंगना रणौतची जेन झी तरुणींवर तिखट शब्दांत टीका
या वादावर सोनाक्षी सिन्हा किंवा तिच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

