Headlines

मुस्लिम मुलासोबत लग्न केल्यानंतर हिंदू मुली डाव्या विचारसरणीकडे वळतात, मी ‘संघी’ का होऊ नये? कंगना रणौत स्पष्टच बोलली


Kangana Ranaut slams actress who married to Muslim:अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नीट आंदोलनात सहभागी झालेल्या जेन झी विद्यार्थ्यांना तिनं जनरेशन गटार असं म्हटलं होतं.

Kangana Ranaut
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाची खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगनानं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात तिनं चित्रपटसृष्टीतील हिंदू महिलांच्या बदलत्या राजकीय व धार्मिक विचारसरणीवर भाष्य केलं आहे. कंगनानं व्हिडिओ शेअर करताना कोणत्याही अभिनेत्रीचं थेट नाव घेतलं नसलं तरी सोशल मीडियावर मात्र चर्चा सुरू आहे.

कंगना रणौत नेमकं काय म्हणाली?
मी चित्रपटसृष्टीतील अनेक हिंदू मुलींना जवळून पाहिलं, माझी त्यांच्यासोबत चांगली ओळखही आहे. त्या हिंदू असतात, पण सुरुवातीला त्यांचा राजकारणाशी किंवा विशिष्ट विचारसरणीशी काही संबंध नसतो. त्या बहुदा तटस्थ असतात. पण जसं त्या मुस्लिम/इस्लामिक व्यक्तीच्या संपर्कात येतात त्यांचे विचार बदलायला लागतात. एखाद्या मुस्लिममुलासोबत लग्न झाल्यानंतर त्यांची विचारसरणी अचानक हिंदू विरोधी होते, एका वर्गाकडे झुकते आणि त्या डाव्या विचारसरणीकडे वळतात, असं कंगना म्हणाली.

Maharashtra TimesOm Puri : ‘त्यांचं मोलकरणीसोबत अफेअर होतं, तरी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला’, ओम पुरींबद्दल एक्स पत्नीचा दावा; म्हणाली, ‘खूप उशीर झालेला’
तसंच पुढं बोलताना तिनं स्पष्ट केलं की, देशाचे संविधान प्रत्येकाला कोणताही धर्म किंवा विचारसरणी स्वीकारण्याचे स्वातंत्र्य देते, त्यामुळं कोणाच्या विचारांवर तिचा आक्षेप नाही. मात्र, जेव्हा लोक तिच्या स्वतःच्या अध्यात्मिक व राजकीय प्रवासावर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा त्यांना खटकतं, हे सांगताना तिनं हा मुद्दा मांडला आहे.

हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात येतात, लग्न करतात आणि अचानक कट्टर डाव्या विचारसणीच्या होतात. लग्नापूर्वी राजकारणाबद्दल त्या काहीच बोलत नाहीत. पण, इस्लामी लोकांच्या संपर्कात येताच त्या कट्टर डाव्या होतात. मग मी ‘संघी’ का होऊ नये? असंही ती म्हणाली.

Maharashtra TimesSubodh Bhave on Sai Tamhankar:’ती इंडस्ट्रीत कितपत टिकेल मला शंका होती, पण आता तिचं कौतुक वाटतं’ सई ताम्हणकरबद्दल भरभरून बोलला सुबोध भावे
कपड्यांवरून अन् बोलण्याच्या शैलीवरून टोला
एवढ्यावरच न थांबता कंगनानं एका अभिनेत्रीच्या कपड्यांच्या आणि बोलण्याच्या पद्धतीवरही निशाणा साधला.एक अभिनेत्री सध्या पॉकेटमारासारखे कपडे घालते आणि बोलते, असं सांगत कंगनानं तिच्या सध्याच्या शैलीवर टीका केली.
Maharashtra TimesAmol Kolhe: मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम, पण इंडस्ट्रीतील लोकांकडून दबक्या आवाजात कौतुक; ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ संदर्भात अमोल कोल्हेंचा आणखी एक मोठा निर्णय

“तुमचा पार्टनर तुम्हाला एखाद्या पाकीटचोरासारखे फिल करायला लावत असेल, तर मला वाईट वाटतं. पूर्वी तू अतिशय सुंदर आणि शोभून दिसायची, आता काय झालं? असा सवालही तिनं विचारला.

ती अभिनेत्री कोण?
कंगनाने या व्हिडिओमध्ये कोणत्याही अभिनेत्रीचं नाव थेट घेतलेलं नाही. मात्र, जून २०२४ मध्ये अभिनेता झहीर इक्बालशी लग्न झालेल्या सोनाक्षी सिन्हानं नीट आंदोलवरही सरकार विरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळं सोनाक्षीच कंगनाच्या या टीकेचं मुख्य लक्ष्य असावी, असं म्हटलं जातंय.तर कंगनाचा रोख स्वरा भास्करकडेही असू शकतो, असंही अनेकांनी म्हटलंय.
Maharashtra TimesKangana Ranaut on Gen Z:’जनरेशन गटार’; मद्यपान, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध; कंगना रणौतची जेन झी तरुणींवर तिखट शब्दांत टीका
या वादावर सोनाक्षी सिन्हा किंवा तिच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा