Headlines

मानवतेच्या हितासाठी युक्रेन युद्ध थांबवा, पंतप्रधान मोदींचं पुतिन यांना आवाहन| Maharashtra Times


Narendra Modi to Putin: किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (SCO) परिषद पार पडली. यावेळी मोदींनी मानवतेच्या हितासाठी युक्रेन युद्ध थांबावा असे आवाहन पुतिन यांना आवाहन केले. याला पुतिन यांनी उत्तर देखील दिले आहे. रशिया आम्ही युद्ध आमच्या अटीवरच थांबवू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आम्हाला शरणागतीची मागणी मान्य नाही , अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

russia ukraine war
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मॉस्को: रशिया आणि युक्रेनमध्ये बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध आणि होणारी धुसफूस यावर मोदी आणि पुतीन यांची भेट अतिशय महत्वाची ठरली आहे. किर्गिस्तानची राजधानी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन दरम्यान या दोघांची भेट झाली. त्यावेळी मोदी यांनी मानवतेच्या हितासाठी हे युद्ध थांबले पाहिजे असे म्हटले.

पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले?

TASS या वृत्त संस्थेनुसार मोदी यांनी म्हटल आहे की, लढाई थांबवण्याच्या प्रत्येक प्रयत्नांना भारत यांचा पाठिंबा असेल. मात्र मानवतेच्या हितासाठी युद्धविराम गरजेचे आहे, अस मोदी म्हणाले. तुम्हाला माहीत आहेच, भारतया संदर्भात शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो आणि आम्ही भविष्यातही देऊ,” मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या बाजूला पुतिन यांना सांगितले, असे क्रेमलिनच्या चर्चेच्या प्रतिलेखानुसार म्हटले आहे.

युद्ध सुरू असलेल्या प्रत्येक दिवशी मानवजात एक पाऊल मागे जाते, तर शांततेच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल संपूर्ण मानवजातीला शांततेची खरी आशा देते. सुरु असलेला युद्ध थांबवणे आणि शत्रुत्व थांबण्याची गरज आहे. असे देखील मोदी म्हणाले

दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांचे केल कौतुक

भारत आणि रशिया या दोन देशांचे आर्थिक संबंध चांगले आहेत. त्या संबधाचा फायदा हा राष्ट्राच्या सर्वोच्च हिताला होईल अस त्यांच म्हणणं आहे. यावर बोलताना मोदी म्हणाले की पुतिन माझे मित्र आहेत. दोन्ही देशातील आर्थिक हितसंबंधांचे पण कौतुक केल आहे.

Maharashtra TimesNepal Flood: महाप्रलयात सगळंच उद्ध्वस्त झालं, मात्र एका घराला काहीच झालं नाही, समोर आलं मजबुतीचं रहस्य

आम्ही याच मार्गावरून पुढे जात आहोत

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध धुमसत आहे. त्यामध्ये मोदी हे मध्यस्थी साधत आहेत. मोदींनी त्यांच्या मित्राला सल्ला दिला आहे. युद्ध सुरू आहे तो पर्यंत आपण एक पाऊल मागे जातो. शांततेच्या दिशेने सगळ्यांनी पाऊल टाकली पाहिजे. आपल्याला अंतहीन राजकारण करण्यापेक्षा युद्ध कस संपेल याकडे सगळ्यांनी भर दिला पाहिजे. मोदींनी या पूर्वी यूक्रेन सोबत शांतता करार करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती.

आम्ही युद्ध फक्त आमच्या अटीवर थांबवू

नरेंद्र मोदी यांनी शांततेच आवाहन केल आहे. मात्र रशिया आम्ही युद्ध आमच्या अटीवरच थांबवू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आम्हाला शरणागतीची मागणी मान्य नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पुढच्या लष्करी मोहिमेत रशिया पुढे काय करणार आहे. याची माहिती नरेंद्र मोदी यांना दिल्याचा दावा या TASS वृत्तवाहिनीने केला आहे.

भारत आणि चीनने स्वस्त दरात घेतलं तेल

भारत आणिचीन हे रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल विकत घेणारे देश आहेत.रशियाने 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि युरोपने रशियावर खूप निर्बंध टाकले. त्यामुळे अनेक देश रशियाकडून तेल विकत घेत नाही आहे. पण भारत आणि चीनने स्वस्त दरात रशियाकडून तेल घेणं सुरू ठेवलं. त्यामुळे रशियाला पैसे मिळत राहिले आणि त्यांचं सरकारचं बजेट भरण्यास मदत झाली आणि युद्धाच्या खर्चाला सुद्धा पैसे मिळाले.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा