Headlines

महाप्रलयात सगळंच उद्ध्वस्त झालं, मात्र एका घराला काहीच झालं नाही, समोर आलं मजबुतीचं रहस्य| Maharashtra Times


Nepal Flash Flood: नेपाळमध्ये 26 ऑगस्टला महापूर आला. या महापुरात सगळंच उद्ध्वस्त झालं. मोठमोठ्या इमारतही जमीनदोस्त झाल्या. मात्र एक हिरव्या रंगाचा घर मजबूत उभं राहील. या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सगळंच उद्ध्वस्त झालं तर हे घर कसं वाचलं? असा प्रश्न विचारलं आहे. यावर आता एका सोशल मीडिया अकाउंटने व्हिडीओ अपलोड केलं आहे. या व्हिडिओमध्ये घर न कोसळण्यामागचे कारण सांगितले आहे.

nepal flood
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयात सगळंच उद्ध्वस्त झालं. अनेक लोक यामध्ये मृत्यूमुखी पडले. अनेकांचा अजूनही पत्ता नाही. वाहून गेलेल्या लोकांचा शोध अजूनही सुरूच आहे. यामध्ये नदीकाठी असलेले गाव महापुरात वाहून गेले. मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या. पायाभूत सोयीसुविधा उद्ध्वस्त झाल्या. मात्र एका घराला काहीच झालं नाही. त्या घरात असलेले लोकही सुरक्षित राहिले. घराच्या चारही बाजूने पुराचे पाणी वाहत असतांना देखील हे घर मजबुतीने उभं राहील. या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आणि एवढ्या महापुरात हे एकच घर कसं वाचलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांना या घराबद्दल जाणून घ्यायचं होतं. नेटकऱ्यांनी या घराच्या मजबुतीचं रहस्य विचारलं. आता हे घर मजबुतीने कसं उभं राहिलं? याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घराच्या चारही बाजूने महापुर, तरीही उभे राहिले घर

हिरव्या रंगाचे एक घर नेपाळच्या तिबेट सीमेला लागून असलेल्या एका गावातील आहे. विनाशकारी पुराच्या प्रवाहात झाडे, वाहने, घरे, मोठ्या इमारती, संपूर्ण गाव वाहून गेलं. जवळपासची अनेक घरे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने कोसळत होती. मात्र एक दोन मजली घरपुराच्या पाण्याच्या मधोमध उभं राहिलं. सोशल मीडियावर या घराचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हैराण होत हे घर कसे उभे राहीले, मजबुतीचा रहस्य काय आहे, इंजिनियरचा कौतुक देखील केलं आहे असे कमेंट्स केले आहेत. मात्र प्रश्न आहे हे घर महापुरात कसे उभे राहिले? हे समजवून सांगणारा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत काय?

‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आर्किटेक्चर प्रेजेंटेशन’ हा अकाउंट आहे. या अकाउंटमध्ये प्रामुख्याने, आर्किटेक्चर, स्ट्रक्चरल इंजीनियरिंग आणि इमारतीची डिजाईन/स्ट्रक्चर यावर एक्सप्लेनेशन देणारे व्हिडीओ शेअर केले जातात. आता महापुरात हिरवे घर मजबुतीने कसे उभे राहिले? यावर एक व्हिडीओ या आकाउंटने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार हे घर केवळ नशीबच नाही तर त्याची बनावट आणि ठिकाणामुळे घराच्या टीकून राहण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

RCC ने बांधण्यात आला घर

नेपाळच्या डोंगराळ प्रदेशातील अनेक घरे हे दगडांच्या भिंतींनी बांधलेली आहेत. अशा भिंती डोंगरावरून येणारे वजन सहन करू शकतात, मात्र बाजूने वेगाने येणारे पाणी आणि मोठ्या मलब्यामुळे सतत दाब पडल्यास त्या कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे घरे अचानक कोसळताना दिसतात. मग असं या हिरव्या घरात विशेष काय होतं ज्यामुळे हे घर कोसळले नाही? तर व्हिडिओनुसार हा हिरवा घर RCC (Reinforced Concrete Frame) वर बांधण्यात आलं आहे. सोप्या भाषेत हे घर स्टीलच्या सळ्याने मजबूत केलेले कॉलम आणि बीम ने बनवण्यात आले. ही रचना घराला एक मजबूत सांगाडा प्रदान करते.

ज्यावेळी जोरदार पाणी आणि मलब्याने ढिगाऱ्याला धक्का दिला, त्यावेळी संपूर्ण दाब केवळ भिंतींवर नाही आला. कॉलम आणि बीमने या संपूर्ण जोरला विभागून देण्यास मदत केली. म्हणून हे घर कोसळले नाही. या घराची जागा देखील कोसळण्यापासून वाचवण्यात महत्वाची होती. हे घर पूर आणि मलबाच्या सर्वात जोरदार मुख्य मार्गाच्या अगदी मध्यभागी नव्हते. म्हणजे पाणी आणि मलब्याचा सर्वाधिक जोर घराला आला नाही तर तो घराच्या बाजूने निघून गेला.

चिखलच बनला ढाल

सुरुवातीला चिखल आणि मलबा घराच्या आजूबाजूला जमा झाला. मात्र काही वेळानंतर तोच घरासाठी ढाल बनला. सुरुवातीला आलेला मलबा हा घराच्या अवती भवती जमा झाला. त्यामुळे नंतर येणाऱ्या पाण्याची आणि मलब्याची काही प्रमाणात दिशा बदलली. यामुळे जो मलबा सुरुवातीला धोकादायक वाटत होता. त्यानेच नंतर थेट पाण्याचा जोरदार प्रवाह कमी करायला मदत केली.

यामहापुरात हिरवे घर केवळ मजबुतीने उभे नव्हते, तर अचूक इंजीनियरिंग, योग्य ठिकाण आणि दुर्मिळ परिस्थितीमुळे वाचले असावे, असे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.