![]()
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी वकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रपडताळणी प्रक्रियेत न्या. संदीप शिंदे समिती स्थापनेनंतर ३१ जुलै २०२६ अखेरपर्यंत एकूण ६१ अर्ज पडताळणी समित्यांनी अवैध (नामंजूर) ठरवले आहेत. याच कालावधीत विभागातील १५,५९७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवून त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यातआली आहेत. शासकीय आकडेवारीनुसार,न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन झाल्यापासून मराठवाड्यातील आतापर्यंतच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जातपडताळणीसाठीचे एकूण २०,१४३ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ६१ अर्ज अवैध तर इतर अर्ज हे प्रलंबित तसेच पडताळणी समितीनेइतर कारणांनी निकाली काढलेआहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विचार करता, जालन्यात सर्वाधिक २३ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये २१, लातूरमध्ये ७, परभणीत५, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अर्ज नामंजूर झाला आहे. हिंगोली आणि धाराशिव या दोनजिल्ह्यांत एकही अर्ज अवैध ठरलेला नाही. निर्धारित करण्यात आलेल्या दिनांकापूर्वीचे पुरावे सादर न करणे, वंशावळ सिद्ध न होणे आणि विशेषकॅम्पमध्ये पुराव्यांची पूर्तता न करणे हीअर्ज अवैध ठरण्याची प्रशासकीय कारणे आहेत. पुरावे सादर केल्यासवैधता प्रमाणपत्र जातप्रमाणपत्र मिळवल्यानंतरसंबंधित व्यक्ती ते वैध आहे कीअवैध आहे, याचा प्रस्ताव सादरकरतात. प्रमाणपत्राला लागणारेपुरावे, जातीदावा सिद्ध करण्यासाठीलागणारे पुरावे सादर केल्यानंतर तोजातीदावा वैध ठरवतो. पुरावे सादरकरू शकले नाही, किंवा पुराव्यातखाडाखोड आहे, पुरावे उपलब्धनाही असे समितीला आढळले तरजातीदावा अवैध ठरवतो.
– दीपक खरात, उपायुक्त, जातपडताळणी समिती व सदस्य जात नोंद, वंशावळसिद्धता नसल्याने अवैध अवैध ठरवण्यात आलेलेप्रमाणपत्रांपैकी बहुतांश प्रकरणांमध्येजात नोंद पुरावा नसणे, जातीचासबळ पुरावा व वंशावळ सिद्धतेचेपुरावे सादर न केल्याने, अक्षर बदलतसेच मानीव दिनांकापूर्वी जात नोंदशालेय व महसुली पुराव्या अभावी वपुरावा धारकाशी नातेसंबंध सिद्धतेचेपुरावे नसल्याने अवैध ठरवण्यातआले असल्याचा शेरा समितीकक्षाच्या नोंदीमध्ये आहे.
Source link
मराठवाड्यात कुणबी जातपडताळणीचे 61 अर्ज अवैध:समितीच्या स्थापनेनंतर 15,597 अर्ज ठरले वैध
