Headlines

भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान BCCI कडून झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीमची घोषणा, संजू सॅमसनला डच्चू; 4 अनकॅप खेळाडूंची निवड


IND vs ZIM T-20 Series News : भारत आणि इंग्लंड टी-२० मालिका सुरू असताना बीसीसीआयने झिम्बाव्बे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. मात्र टीममधून संजू सॅमसन याला वगळले असून चार अनकॅप खेळाडूंना संधी दिलीये. नेमके कोण आहेत? जाणून घ्या.

IND vs ZIM
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये टी-२० मालिका सुरू असताना बीसीसीआयने आगामी झिम्बाव्बे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. येत्या २३ जुलैपासून ही भारत आणि झिम्बाव्बेमध्ये तीन सामन्यांची मालिका सुरू होणार असून या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली असून स्टार खेळाडू रिंकू सिंगने कमबॅक केले मात्र संजू सॅमसन याने आपले स्थान गमावले आहे.

भारतीय संघातून गेल्या दोन वर्षांपासून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या मयंक यादव याला संघात जागा मिळाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता. तर दुसरीकडे रिंकु सिंगला वर्ल्ड कपनंतर आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली नव्हती. मात्र आता त्याचेही कमबॅक झाले आहे. त्यासोबत आतापर्यं भारताकडून न खेळलेल्या तीन अनकॅप खेळाडूंचीही निवड झाली आहे. यामध्ये यश ठाकूर, अशोक शर्मा, विकेटकीपर प्रभसिमरन सिंह यांचा समावेश आहे. आताच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर आता त्यांची थेट भारतीय संघात निवड झालीये.
Maharashtra TimesWomens World Cup Winner 2026 : वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा मारली बाजी, इंग्लंडवर घरच्या मैदानावर 7 विकेटने मात, कोणी फिरवली मॅच?

संजू सॅमसनची निवड नाही

भारताला वर्ल्ड कप २०२६ मध्ये जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या संजू सॅमनस याची निवड झाली आहे. आता सुरू असलेल्या इंग्लंड मालिकेत संघात प्लेइंग ११ मधून त्याला बाहेर केले गेले आहे. इंग्लंडविरूद्ध खाली बसवले आणि आता झिम्बाव्बेच्या दौऱ्यासाठी त्याची निवड केली नाही. तर वैभव सूर्यवंशी याचे संघात कायम ठेवण्यात आले आहे.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : काय सांगता! पहिल्या मॅचमध्ये वैभवच्या 14 धावा पण सचिनसोबतचा योगायोग चक्रावून टाकणारा, नेमका काय?
बीसीसीआयने संघाची घोषणा करताना एक अपडेट दिली आहे. ती म्हणजे आगामी इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेमध्ये शिवम दुबे याच्या जागी नीतीश कुमार रेड्डी याची निवड झाली आहे. त्यामुळे दुखापतीमुळे आयर्लंडविरूद्ध बाहेर पडलेल्या नीतीश कुमार रेड्डी याची संघात एन्ट्री झालीय.

झिम्बाब्वे टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :- श्रेयस अय्यर (C), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (VC), इशान किशन (WK), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक सिंह, मयंक यादव (WK)

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा