Abhishek Sharma Record : आयर्लंडविरूद्धचा पराभव पोरांच्या मनाला चांगलाच लागला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या सामन्यात भर पावसात धुतलं. अभिषेक शर्मा याने १०० षटकार पूर्ण करत इतिहास रचला आहे. इंग्लंड संघाच्या मदतील पाऊस धावला नाहीतर भारतीय संघ आज जिंकण्याच्या इराद्यानेच उतरला होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताने २० ओव्हरमध्ये १८९-७ धावा केल्या होत्या. भारताची सुरूवात एकदम खराब झाली होती. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट गेल्याने भारतावर दबाव निर्माण झाला होताय. मात्र अभिषेक शर्मा याने हलका पाऊस सुरू असताना आपल्या वादळी खेळीला सुरूवात केली. पठ्ठ्याने अवघ्या २० बॉलमध्येच आपले ११वे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतरही अभिषेक थांबला नाही, १ षटकार मारला आणि मोठ्या खेळीच्या दिशेने त्याने वाटचाल केली होती. परंतु आपल्या आक्रमक अंदाजात खेळत असताना साकिब महमूद याने त्याला आऊट केले. अभिषेकने ५९ धावा करताना त्याने एक मोठा पराक्रम त्याने नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. भारताचा डाव झाल्यावर पावसाने थांबायचं नाव घेतलं नाही. अखेर सामना रद्द करण्याचा करण्याचा निर्णय घेतला.
अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी चेंडूत १०० षटकार मारणारा तो अभिषेक शर्मा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अभिषेकने फक्त ७८५ चेंडूंमध्येच १०० षटकार मारले आहेत. हा विक्रम वेस्ट इंडिजचा एविन लुईसच्या नावावर होता, त्याने ७८९, फिन ॲलन ८७१, टिम डेव्हिड ९३१ चेंडूत ही कामगिरी केली होती. यासोबतच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकणारा अभिषेक शर्मा हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा (२०५), सूर्यकुमार यादव (१७९), हार्दिक पांड्या (१२६) आणि विराट कोहली (१२४) यांच्यानंतर त्याचा यादीत समावेश झाला आहे.
कमी चेंडूत १०० षटकार मारणारे फलंदाज
अभिषेक शर्मा- (भारत) ७८५ चेंडू
एविन लुईस (वेस्ट इंडिज) ७८९ चेंडू
फिन ॲलन (न्यूझीलंड) ८७१ चेंडू
टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया) ९३१ चेंडू
कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) ९६३ चेंडू
सूर्यकुमार यादव (भारत) १००७ चेंडू
दरम्यान, भारताकडून अभिषेक शर्मा ५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर याने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर याने जबाबदारीने मैदानावर थांबवत धावफलक हलता ठेवत ४७ चेंडूत ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडमध्ये अर्धशतक ठोकणारा तो पहिला भारताचा कर्णधार ठरलाय, त्यानंतर भारताला १९० पर्यंत पोहोचवण्यात शिवम दुबे याने महत्त्वाची भूमिका निभावली. शिवमने २१ चेंडूत ४२ धावा करताना २ चौकार आणि ३ षटकार मारले. भारतीय गोलंदाजा इंग्लंडला रोखण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा