Headlines

Rules Change From 1st July 2026; जुलैपासून खर्चाचे गणित बदलणार, आजपासून 11 बदल लागू; ITR पासून आधार, पासपोर्ट अन् LPG पर्यंत परिणाम होणार!

New Rules From 1st July Today: आजपासून जुलै महिना सुरू झाला आहे आणि यासोबतच देशात काही मोठे आर्थिक बदलही लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांचे दैनंदिन आयुष्य व खिशावर होईल. यामध्ये ITR फायलिंग, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, एलपीजीच्या सुधारित किमती आणि आधार अपडेट्स यांसारख्या महत्त्वाच्या नियमांचा समावेश आहे, ज्याच्याबद्दल सर्वांनाच माहिती असली पाहिजे.

Rules Change from 1st July 2026 Affecting Common Man
1 जुलै 2026 पासून कोण-कोणते बदल लागू झाले?
Financial Rules Changing From 1 July: प्रत्येक महिन्याप्रमाणे जुलै 2026 महिन्यापासूनही अनेक प्रशासकीय आणि आर्थिक बदल लागू होणार आहेत. त्यामुळे प्रवासी, आधार कार्ड धारक आणि एलपीजी ग्राहकांनी या नवीन नियमांची आगाऊ माहिती घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या की प्रत्येक महिन्यासोबत केवळ कॅलेंडर बदलत नाही तर, तुमच्या खर्चाचे गणितही बदलणार आहे. त्यामुळे, नवीन नियम आधीच समजून घेणे आणि त्यानुसार आपली आर्थिक योजना आखणे शहाणपणाचे ठरेल.

जुलै 2026 पासून लागू होणार 9 मोठे बदल

जुलै 2026 पासून लागू होणार 9 मोठे बदल

आजपासून देशभरात वेगवेगळे बँकिंगसह वित्तीय नियमांमध्ये बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर, रेल्वे प्रवास आणि दैनंदिन व्यवहारांवर होऊ शकतो. आधार कार्ड अपडेट करण्यापासून ते वाढीव रेल्वे दंड, नवीन पासपोर्ट शुल्क आणि LPG सिलिंडरच्या किमतींपर्यंत, असे अनेक बदल आहेत जे लोकांना माहिती असले पाहिजे. अशाच 9 बदलांविषयी आपण जाणून घेऊ, ज्यांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल.

आयटीआर फायलिंगची शेवटची तारीख

आयटीआर फायलिंगची शेवटची तारीख

26 या आर्थिक वर्षांसाठी नोकरदार करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी 31 जुलै 2026 पर्यंत मुदत दिली गेली आहे. ही तारीख चुकली तर, करदात्यांना दंड आकारला जाईल. उशिराने आयटीआर दाखल केल्यास 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता वेळेवर आपले रिटर्न दाखल करा.

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला

गेल्या सहा महिन्यातील महागाईनंतर व्यावसायिक सिलिंडर या वर्षी पहिल्यांदाच स्वस्त झाला आहे. 1 जुलै 2026 पासून लागू व्यावसायिक आणि हॉटेल-रेस्टोरंट्सला दिलासा मिळाला असून 19-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 183.50 रुपयांची घट झाली पण, सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चावर कोणताही परिणाम झालेला नसू 14.2-किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

1 जुलै रोजी सकाळीच एका पाठोपाठ एक आनंद वार्ता ऐकायला मिळत आहेत. पश्चिम आशियातील तणाव निवळला आणि तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीच्या पृष्ठभूमीवर नायरा एनर्जीने महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोलच्या दरात 5 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात केली आहे.

आधार अपडेट मोफत होणार

आधार अपडेट मोफत होणार

1 जुलै 2026 पासून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत UIDAI ने जाहीर केल्यानुसार आधार मोबाईल ॲपद्वारे ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ज्यांचा ई-मेल ॲड्रेस आधारशी जोडलेला नाही किंवा ज्यांना जुना ई-मेल बदलायचा आहे, त्यांना ही सुविधा मोफत उपलब्ध होईल.

क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड्स आणि बेनिफिट्सध्ये बदल

क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड्स आणि बेनिफिट्सध्ये बदल

1 जुलैपासून अनेक बँकांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल लागू होत आहेत. SBI क्रेडिट कार्डांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची रचना बदलेल आणि HDFC क्रेडिट कार्डांसाठी एअरपोर्ट लाउंजमध्ये एंटर करण्यासाठी खर्चाच्या अटी अधिक कडक केल्या जातील. उदाहरणार्थ लाउंजमध्ये एन्ट्रीसाठी आता मागील तिमाहीत ठराविक रकमेचा खर्च करणे अनिवार्य असेल. म्हणजे, क्रेडिट कार्ड वापरण्याच्या पद्धतीत बदल होईल.

पासपोर्ट बनवायला अधिक खर्च करावा लागणार

पासपोर्ट बनवायला अधिक खर्च करावा लागणार

तुम्ही नवीन पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर लक्षात घ्या की 1 जुलैपासून अर्ज करणे महाग होणार आहे. नियमित पासपोर्ट शुल्क अंदाजे 2500 रुपयांपर्यंत वाढेल, तर तत्काळ पासपोर्टसाठी अंदाजे 5000 रुपये खर्च येईल. तसेच नवीन शुल्क वाढ सर्वच सेवांसाठी लागू होतील.

पेट्रोल-डिझेल खरेदीवरील सर्व निर्बंध रद्द

पेट्रोल-डिझेल खरेदीवरील सर्व निर्बंध रद्द

सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या स्वस्ताईसाठी काही दिवस आणखी वाट पाहावी लागू शकते पण, त्याआधी सरकारने ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स आणि मोठ्या प्रमाणावर इंधन लागणाऱ्या उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आज, 1 जुलैपासून, व्यावसायिक ग्राहकांना पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदीवर लादलेले सर्व तात्पुरते निर्बंध सरकारने पूर्णपणे उठवले आहेत. म्हणजे आजपासून व्यावसायिक ग्राहक कोणत्याही मर्यादेशिवाय थेट पेट्रोल पंपांवरून हवे तितके पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतील.

रेल्वे तिकीट आणि प्रवासाचे नियम

रेल्वे तिकीट आणि प्रवासाचे नियम

1 जुलैपासून रेल्वेच्या नियमांमध्ये मोठे बदलही नियोजित आहेत. वैध तिकीटाशिवाय रेल्वेमधून प्रवास केल्यास दंड आकारला जाईल. तसेच, दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. महिलांच्या डब्यात अयोग्यरित्या प्रवास केल्यास मोठा दंड आकारला जाईल.

एलपीजी सिलिंडरचे नियमही बदलले

एलपीजी सिलिंडरचे नियमही बदलले

1 जुलै 2026 पासून LPG संबंधित अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत, ज्याचा लाखो ग्राहकांवर परिणाम होईल. सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी आता ओटीपी आणि डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड म्हणजे DAC अनिवार्य असेल. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी अनिवार्य केले गेले आहे.

पीएनजी आणि एलपीजी कनेक्शनसंबंधित नियमांमध्येही बदल

पीएनजी आणि एलपीजी कनेक्शनसंबंधित नियमांमध्येही बदल

पेट्रोलियम मंत्रालयानुसार, ज्या कुटुंबांकडे PNG कनेक्शन आहे आणि अजूनही LPG सिलिंडर बुक करतात, त्यांना 30 दिवसांच्या पीएनजी कनेक्शन सक्रिय करून एलपीजी सिलिंडर हँडओव्हर करणे अनिवार्य असेल. या बदल्यात त्यांना ट्रान्सफर व्हाउचर दिला जाईल. तसेच ग्राहक अशा भागात स्थलांतरित झाले जिथे एलपीजी उपलब्ध नाही, तर पुन्हा एलपीजी कनेक्शन मिळवण्यासाठी या व्हाउचरचा वापर करू शकतात.

गॅस बिल न भरण्यासंबंधीचे नियम

गॅस बिल न भरण्यासंबंधीचे नियम

पीएनजी कनेक्शनचा ग्राहक 2 महिने बिल भरू शकला नाही तर, त्यांचे कनेक्शन कट केले जाईल आणि बिल भरल्यानंतरच कनेक्शन पुन्हा सुरू केले जाईल. याव्यतिरिक्त, तुमच्या पीएनजी पाइपलाइनमध्ये काही समस्या निर्माण झाली किंवा कोणी जाणूनबुजून व्हॉल्व्ह तोडले, तर झालेल्या नुकसानीसाठी ग्राहकाला जबाबदार धरले जाईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा