#sureshdhas #mlaelection #bjp #goipnathmunde #panditannamundeगोपीनाथरावजी यांच्याजवळ आम्ही गेलो तेव्हा पंडित अण्णा मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. प्रकाश दादा सोळंके आणि मी आम्हा दोघांना जी संधी दिली गेली. त्यावेळेस पंडित अण्णा यांनी आग्रहाने सांगितलं होतं की हे दोघेही जिल्हा परिषद सदस्य आहेत.हे दोघेही आमदार होऊ शकतात. त्यावेळेस मुंडे साहेबांनी दोन जागांची अल्टा पलटी करून आष्टी ही जागा भाजपासाठी सोडून घेतली आणि मी आमदार झालो असं किस्सा भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, आमदार प्रकाश दादा आम्ही एका टर्मचे आहोत. असाही सुरेश धस म्हणाले. बीडच्या आष्टी येथे आयोजित सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.