Headlines

बेलारुसची साबालेंका पराभूत


एकतेरिना अॅलेक्सांड्रोव्हा : साबालेंकाला धक्का

वृत्तसंस्था, टोरँटो

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या महिलांच्या कॅनडा ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारुसची टॉप सिडेड आर्यना साबालेंकाला एकेरीच्या चौथ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या एकतेरिना अॅलेक्सांड्रोव्हाने साबालेंकाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील झालेल्या सामन्यात रशियाच्या अॅलेक्सांड्रोव्हाने साबालेंकाचा 7-6 (3-6), 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. या लढतीमध्ये अॅलेक्सांड्रोव्हाने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये साबालेंकाने वेगवान सर्व्हिसच्या जोरावर हा सेट जिंकून बरोबरी साधली. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये 16 व्या मानांकित अॅलेक्सांड्रोव्हाने बेसलाईन खेळावर भर देत विजय नोंदवून साबालेंकाचे आव्हान संपुष्टात आणले. आता अॅलेक्सांड्रोव्हाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना युक्रेनच्या स्विटोलिनाशी होणार आहे. स्विटोलिनाने चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या आठव्या मानांकित अमंदा अॅनिसिमोव्हाचा 6-2, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत