Headlines

फायर ऑडिट कडे द़ुर्लक्ष ; आता मात्र व्हेंटिलेटर तपासाच्या रडारवर, महिन्याभरीपूर्वीचा धोक्याचा इशारा दडपला ?


Amravati Hospital NICU Fire :जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासकीय दिरंगाईची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फायर ऑडिटकडे दुर्लक्ष
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,अमरावती: सुमारे महिनाभरापूर्वी रुग्णालयाच्या एका कक्षातील वॉशिंग मशिन जळून खाक झाली होती. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांपासून लपवून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. त्याच वेळी संपूर्ण इमारतीच्या विद्युत यंत्रणेची आणि वायरिंगची सखोल तपासणी झाली असती, तर शॉर्टसर्किटचा संभाव्य धोका आधीच समोर आला असता आणि तीन बालकांचे प्राण वाचले असते, अशी चर्चा आहे.

इमारत अवघ्या एक-दोन वर्षांपूर्वीची आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कशी कोलमडली

इमारत अवघ्या एक-दोन वर्षांपूर्वीची आणि अद्ययावत असतानाही आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कशी कोलमडली, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पहाटे व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी रुग्णालयातील ‘फायर अलार्म’ वाजलाच नाही. एवढेच नव्हे, तर आगीचा धूर पसरल्यानंतर आपोआप सुरू होणारे ‘फायर फॉगर’ही कार्यान्वित झाले नाहीत.

प्रशासकीय दिरंगाईची धक्कादायक माहिती समोर

जिल्हा स्त्रीरुग्णालयातील (डफरिन) नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासकीय दिरंगाईची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयाचे ‘ फायर ऑडिट ’ करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने तब्बल ३७ दिवस या अत्यंत संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.

‘मटा’ने दुर्घटनेतील तांत्रिक त्रुटी , प्रशासकीय हलगर्जीपणावर प्रकाश टाकला

‘मटा’ने या दुर्घटनेतील तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय हलगर्जीपणावर प्रकाश टाकला होता. आता समोर आलेल्या नव्या माहितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी २५ जून रोजीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला रुग्णालयाचे फायर ऑडिट तातडीने पूर्ण करण्यासाठी अधिकृत पत्र दिले होते. मात्र, तीन आठवडे उलटूनही कोणतीही हालचाल न झाल्याने डॉ. पवार यांनी १७ जुलै रोजी पुन्हा स्मरणपत्र पाठवले.

Maharashtra TimesGhatkopar Development Works:कामे अपूर्ण तरी कंत्राटदारांना निधी ?२८ पैकी २४ कामांना सुरुवातही नाही; घाटकोपरमधील प्रकार

प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी किंवा सुरक्षा तपासणी करण्याचे सौजन्य दाखवले नाही

डॉ. पवार यांनी कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांशी वैयक्तिक संपर्क साधला असता, ‘प्रक्रिया सुरू असून लवकरच एजन्सी नियुक्त केली जाईल’, अशीच उत्तरे देण्यात आली. तब्बल ३७ दिवस उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी किंवा सुरक्षा तपासणी करण्याचे सौजन्य दाखवले नाही.

Maharashtra TimesNashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’

व्हेंटिलेटरही तपासाच्या रडारवर

दुसरीकडे, आगीच्या घटनेशी संबंधित असल्याचा संशय असलेले व्हेंटिलेटरहीतपासाच्या रडारवर आले आहे. नागपूर येथील एका कंपनीकडून अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले होते. अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. जी. राऊत यांनी सोमवारी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या उपकरणांबाबत शंका उपस्थित केली होती. या उपकरणांचा दर्जा आणि खरेदी प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा