Headlines

पोलीस दलातील तिघांचा कमांडेशन पदक देऊन सन्मान


त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : बेळगाव पोलीस दलातील तिघा जणांना पोलीस दलातील मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. 2025-26 सालासाठीचे डीजी अँड आयजीपी कमांडेशन पदक जाहीर झाले आहे.

सीआर विभागाचे आरपीआय जाफरसाब एच. शेख, शहर विशेष विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजीवकुमार कुराडे व सीसीआरबी विभागातील हवालदार महादेव काशिद यांची या विशेष सन्मानासाठी निवड झाली आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या अधिकारी व हवालदारांनी बजावलेल्या अत्युत्तम सेवेची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत