ठाकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परभणीत उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. परभणी हिंगोली विधान परिषदेचा निकाल समोर आला असून या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सईद खान विजयी झाले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विवेक नावंदर यांचा पराभव झालाय. विशेष म्हणजे सईद खान यांना खासदार संजय जाधव यांच्याकडूनही मदत झाल्याचं स्वतः खान यांनी सांगितलं. आधीच ऑपरेशन टायगरमध्ये नाव असलेले संजय जाधव यांनी विधान परिषदेतही ठाकरेंना धक्का दिल्याचं समोर आलंय. खान यांच्या विजयानंतर संजय जाधव यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छाही दिल्या आहेत.