Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवन शरीरावर नव्हे, आत्म्यावर आधारित; ही रक्षाबंधन शिकवण




आपल्या आत खोलवर डोकावून पाहिले, तर कुठला ना कुठला प्राणी सक्रिय दिसून येईल. हा प्राणी जागा होतो आणि बाहेरच्या वर्तनावर ताबा मिळवतो, तेव्हा माणूस प्राण्यासारखा वागू लागतो. भारतीय परंपरेने त्याला आवर घालण्यासाठी रक्षाबंधनाचा सण निर्माण केला. एक छोटासा धागा आपल्याला नैतिक बनवतो. स्त्री आणि पुरुषाच्या शारीर आकर्षणाला सात्विक रूप देतो. पुन्हा आपुलकी निर्माण करतो. हाकेने आपले लोक लगेच धावून येतील, ती हाक आता जिभेतून निघणेच बंद झाले आहे. कारण आपली आपुलकीच कुठतरी हरवून गेली आहे. म्हणूनच रक्षाबंधन हे अतिशय गूढ व खोल तत्त्वज्ञान आहे. एकाच आई-वडिलांची मुले नसलात तरी पुरुषाने स्त्रीबद्दल व स्त्रीने पुरुषाबद्दल सात्विक,समर्पणाची भावना ठेवावी; हीच खरी राखी आहे. या दिवशी आपण अचानक स्वतःच्या आत एक शुद्धता अनुभवतो. माणूस असण्याचा अभिमान वाटतो. हे जीवन फक्त शरीरावर नाही तर आत्म्यावर आधारित आहे. हा सण याची जाणीव करून देतो.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत