Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तरुण वयात चारित्र्य समजून‎ घ्या, आपल्या तेजाचा वापर करा




आजकाल विशेषतः नवी पिढी प्रचंड परिश्रम करत आहे. पण आता‎परिश्रमासोबतच शिक्षण, योग्यता व संस्कारांचे तेजही त्यात मिसळावे‎लागेल. कारण आपण संस्कार स्वीकारतो, तेव्हाच आपल्या‎चारित्र्यावर ठाम राहू शकतो. मनातून तेज प्रकट होते, ते चारित्र्यातून‎येते; बाह्य व्यक्तिमत्त्वातून नाही. आपल्यामध्ये सूर्यासारखे तेज आहे,‎फक्त ते प्रकट करण्याची गरज आहे. तुलसीदासजींनी लिहिले आहे-‎‘राकापति षोडस उअहिं तारागन समुदाइ, सकल गिरिन्ह दव लाइअ‎बिनु रबि राति न जाइ।’ म्हणजेच, सर्व तारांगणांसोबत 16 कलांनी‎परिपूर्ण असा चंद्र उगवला आणि सर्व पर्वतांवर वणवा पेटला, तरीही‎सूर्याचा उदय झाल्याशिवाय रात्र संपू शकत नाही. विशेषतः तरुण वयात‎चारित्र्याचे महत्त्व समजून घ्या आणि आपल्या तेजाचा योग्य वापर‎करा. वय निघून जात असते. कोणताही काळ इतका सुंदर नसतो की तो‎आयुष्यभर थांबून राहील. म्हणूनच बालपणापासूनच मुलांना‎सूर्यनमस्काराशी जोडा. सूर्याला अर्घ्य देण्याच्या परंपरेचे वैज्ञानिक‎महत्त्व समजावून सांगा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत