- Marathi News
- Opinion
- India Bangladesh Relations & Tarique Rahman Visit Controversy | Palki Sharma
1 तासापूर्वी
- कॉपी लिंक

बांगलादेश भारतासाठी एक अडचण बनत चाललाआहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे आता कठीण होतआहे. सध्या सर्वात मोठा मुद्दा बांगलादेशचे पंतप्रधानतारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याचा आहे.भारताने त्यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे. खरे तर दोननिमंत्रणे आहेत—एक द्विपक्षीय दौऱ्याचे आणि दुसरेब्रिक्स परिषदेचे. तरीही रहमान भारतात येणार का,याबद्दलचा गोंधळ रोज वाढत चालला आहे.
ऑगस्टच्या शेवटी ते येतील अशी अपेक्षा होती. पण नंतरशेख हसीना यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नव्यासरकारवर बांगलादेश उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला.दुसरीकडे, रहमान यांच्या मंत्र्यांनी भारतावर हसीना यांनापाठिंबा दिल्याचा आरोप केला. यामुळे हा दौरालांबणीवर पडला. आता रहमान यांच्या सल्लागारांचेम्हणणे आहे की, त्यांचा पहिला भारत दौरा हा द्विपक्षीयच असावा. यामुळे ब्रिक्स परिषदेतील त्यांच्या सहभागाची शक्यता संपल्यासारखीच आहे. तर दुसरीकडे द्विपक्षीयदौरा अजूनही अनिश्चित आहे. रहमान यांच्यादौऱ्याबाबतचा हा गोंधळ दोन्ही देशांतील अनिश्चित संबंधाचाच पुरावा आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे आता हसीना यांच्या काळातील जुन्या दिवसांतपरत जाणे शक्य नाही. हसीना यांचा कार्यकाळ दोन्ही देशांतील अत्यंत जवळीक, विश्वास आणि सहकार्याचाहोता. ढाका हा भारताचा विश्वासू भागीदार होता. आतामात्र गणिते बदलली आहेत. आज तिथे उदारमतवादीआणि धर्मनिरपेक्ष पक्षासाठी फारशी जागा उरलेली नाही.तसेच मतदारांच्या एका वर्गात भारताविषयी संशयवाढला आहे. हसीना आजही पुनरागमनाच्या गप्पामारतात, पण सध्या तरी ते अशक्य दिसते. सुरवातीलारहमान यांची भूमिका भारताबाबत तर्कसंगत व संतुलितवाटत होती. पण अलीकडचे संकेत चिंताजनक आहेत.पाकिस्तानसोबत काम करण्याची बांगलादेशची वाढतीउत्सुकता चिंतेची बाब आहे. याचे सर्वात मोठे उदाहरणम्हणजे ‘इस्लामिक नाटो” म्हटले जाणाऱ्या आघाडीतीलढाकाचे स्वारस्य. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणितुर्किये यांनी एका परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केलीआहे. या करारानुसार, या तिन्हींपैकी एका देशावरझालेला हल्ला सर्वांवर झालेला हल्ला मानला जाईल.बांगलादेशने आता म्हटले आहे की, या तीन देशांशीजोडलेल्या कोणत्याही आर्थिक किंवा लष्करी चौकटीतसामील होण्याबाबत त्यांची भूमिका सकारात्मक आहे.असे झाले तर 1971 चा इतिहास व मुक्तीसंग्राम काळातपाकिस्तानी सैन्याने केलेला नरसंहार यानंतरही हे दोन्हीदेश एकाच लष्करी आघाडीत येऊ शकतात. हीपरिस्थिती रणनीतिकदृष्ट्या भारतासाठी अस्वस्थकरणारी आहे. सध्या हा कथित ‘इस्लामिक नाटो” गटप्रामुख्याने पश्चिम आशियापुरता मर्यादित आहे. ते थेटभारताच्या विरोधात दिसत नाही. पण बांगलादेश त्याचासदस्य होताच संपूर्ण परिस्थिती बदलेल. मग हा गटदक्षिण आशियात आणि पर्यायाने भारताच्या पूर्वसीमेपर्यंत येऊन पोहोचेल. बांगलादेश परराष्ट्र धोरणाचाविस्तार करत आहे. हे पुढेही सुरू राहील. या दुसऱ्यावास्तवासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल.बांगलादेश हा महत्त्वाचा किनारपट्टीचा 17.8 कोटीलोकसंख्येचा देश आहे. गेल्या दोन दशकांतील त्याचीआर्थिक प्रगतीही प्रभावी राहिली. अमेरिका , चीन तिथेआपला प्रभाव पाडू पाहतोय. युरोपलाही तिथे आपलाहिस्सा हवा आहे. आता पश्चिम आशियातील शक्तीहीया समीकरणात सहभागी होत आहेत. हसीना यांच्याकाळातही बांगलादेश आपले परराष्ट्र धोरण व्यापक करतहोता. रहमान यांच्या काळात ही प्रक्रिया आणखी वेगवानहोण्याची शक्यता आहे. भारत हे रोखू शकत नाही.बांगलादेशने इतर देशांना दूर ठेवून फक्त भारताचीचनिवड करावी, अशी अपेक्षा भारत करू शकत नाही.परंतु, स्वतःचे हितसंबंध जपणे आणि थेट भारताच्यासुरक्षेवर परिणाम करणारा रणनीतिक पर्याय निवडणे यातफरक आहे. पाकिस्तानशी जोडलेला आणि भारताच्यापूर्व शेजारापर्यंत पोहोचणारा कोणताही लष्करी करार हादुसऱ्याच श्रेणीत येईल. आपल्याला सावधगिरीचासमतोल साधावा लागेल—शत्रुत्वाशिवाय सतर्कता ,संवाद ठेवावा लागेल. काही दिवसांपूर्वी भारतीयउच्चायुक्तांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींना रहमानयांचा भारत दौरा ‘संस्मरणीय” करायचा आहे. कदाचितभारत व्यक्तिगत मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवत आहे. हीवाईट कल्पना नाही. कारण राजकीय उलथापालथअसूनही या नात्याचा पाया अजूनही मजबूत आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. )
भारताचे ध्येय जुना बांगलादेश परतमिळवणे हे नाही. भारताला आता नव्याबांगलादेशसोबत काम करण्याचा नवामार्ग शोधावा लागेल. बांगलादेश जास्तस्वतंत्र आहे. तेथे जास्त विविधता आहे.तो आपल्याशी पूर्णपणे मैत्रीपूर्ण नसला,तरीही एक महत्त्वाचा शेजारी देश आहे.

