Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मेहनत आपल्याला करायची; पण त्याला ताकद देवच देईल




जीवनात दोन प्रकारची वादळे येतात- एक ‘आले-गेले’ वादळ आणि दुसरे ‘आले-घेऊन गेले’ वादळ. ‘आले-गेले’ वादळ म्हणजे ते आले, निघून गेले. तुम्हाला त्याचा फरक पडला नाही. पण काही वादळे आपल्यासोबत खूप काही घेऊन जातात- सुख, समाधान, शांती आणि आरोग्य. जीवनात वादळाचा सामना करण्यासाठी तीन गोष्टी करा. पहिली, पुरुषार्थ.याचा अर्थ, आपण जे काम करू, ते उत्साहाने करू. आपण आनंदात राहू. आपल्या कर्मात सत्य, नैतिकतेचा अंश असेल. दुसरी गोष्ट, प्रार्थना. प्रार्थनेचा अर्थ काही मागणे असा नसतो. देवाने आपल्याला मनुष्य बनवले, त्याबद्दल आपण ईश्वराजवळ व्यक्त केलेली ती कृतज्ञता असते. तिसरी गोष्ट आहे, प्रतीक्षा. याचा अर्थ असा विश्वास की, आपण कर्म केले आहे आणि त्याचा परिणाम ईश्वर देईल. तो फळ देईल, यात आपल्याला कोणतीही शंका नाही. मेहनत आपल्यालाच करायची आहे, पण त्या मेहनतीमागची ताकद देव देईल. असे झाले तर मोठ्यातील मोठे वादळ ‘आले-गेले’ असेच राहील, ते ‘आले-घेऊन गेले’ असे ठरणार नाही.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत