मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने पकड मिळवली आहे. भारताला रविवारच्या ४६०-९ वरून आज सुरूवात करताना एकाही धावेची भर घालता आली नाही. प्रसिद्ध कृष्णा याला आऊट करत लंकेने भारताला ऑल आऊट केले. मात्र श्रीलंकेसाठी नेहमी घातक ठरत आलेल्या मोहम्मद सिराज याने पुन्हा एकदा आपला दणका पहिल्याच ओव्हरमध्ये यजमान श्रीलंकेला दिला. निशान फर्नांडोला शून्यावर माघारी पाठवत झकास सुरूवात करून दिली.
श्रीलंकेचाअर्धा संघ पहिल्या डावात लंचपर्यंत माघारी गेला आहे. सिराजनंतर मानव सुतार दोन, कुलदीप आणि जडेजा यांनी एक एक विकेट घेतली आहे. श्रीलंका संघाची आताची अवस्था २८ ओव्हर ९९-५ अशी असून भारताकडे ३६३ धावांची आघाडी आहे. मोहम्मद सिराज याने पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. श्रीलंकेविरूद्ध कोणताही फॉरमॅट असूदेत सिराज एकदम फायर मोडमध्ये येतो. श्रीलंकसमोर खेळतान आतापर्यंत त्याने नेहमीच आव्हान निर्माण केले आहे.
IND vs SL : ‘अरे ऋषभ, कॉमन सेन्स आहे का तुला’; भारत-श्रीलंका कसोटीमध्ये मोहम्मद कैफ पंतवर इतका का भडकला? आशिय कप २०२३चा फायनल सामना कायम सर्वांच्या आठवणीत राहणारा आहे.कारण एकट्या सिराजने श्रीलंका संघाला गुडघ्यावर आणले होते. पठ्ठ्याने सात ओव्हरमध्ये २१ धावा देताना विकेट नावावर केल्या आहे. आपल्या करियरमधील वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती. सिराजच्या सहा विकेटमुळे श्रीलंका संघ ५० धावांवर ऑल आऊट झाला होता. यामधील चार विकेट त्याने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. भारतासाठी ५१ धावांचे टार्गेट होते, १० विकेटने हा सामना जिंकत आठव्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. आताच्या कसोटीआधी सिराजने सराव सामन्यात भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये १६ धावांची गरज असताना तीन षटकार ठोकत विजय मिळवून दिला होता.
भारतीय संघ (प्लेइंग 11) : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (C), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा