Headlines

नवी मुंबईत रेल्वे स्थानकांचा विकास होणार, तीन स्थानकं ‘सिडको’कडून मध्य रेल्वेच्या ताब्यात; कुठे-कसा होणार फायदा?| Maharashtra Times


Navi Mumbai Railway Stations: अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा तिढा सुटला नव्हता. सिडकोच्या ताब्यात असलेली तीन स्थानकं अखेर मध्य रेल्वेकडे आली आहेत. यामुळे स्थानकांवर पायाभूत सुविधांचा विकास होण्याची अपेक्षा आहे.

नवी मुंबई रेल्वे स्थानकं
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे: मध्य रेल्वे आणि सिडको प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील रेल्वेस्थानके सिडकोच्या ताब्यात असून त्याचा वापर मध्य रेल्वेकडून केला जात आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकांच्या देखभाल-दुरूस्तीकडे दोन्ही प्राधिकरणांकडून टाळाटाळ केली जाते. यामध्ये रेल्वे प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अखेर सोमवारी सिडकोच्या ताब्यातील तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित रेल्वेस्थानकांचेही मध्य रेल्वेकडे लवकरच हस्तांतरण होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावं लागत

सिडकोच्या ताब्यात असलेल्या वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे २००३ आणि २००८ मध्ये संपले होते. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नव्हता. तर ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नव्हता. यामुळे आवश्यक सोयी-सुविधांअभावी प्रवाशांचे हाल होत होते. मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन या दोन्ही प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत होते.

Maharashtra TimesNavi Mumbai Metro: नवी मुंबईत दोन मेट्रो मार्गिकांना मंजुरी, प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींचा खर्च; थेट विमानतळापर्यंत जोडणार

अखेर यासंदर्भात खासदार म्हस्के यांनी १५ मे २०२६ रोजी रेल्वे मुख्यालयात बैठक घेऊन यासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले होते. पुढील महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्ये रेल्वेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी तीन स्थानकांची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. सिडको भवन (बेलापूर) येथे आयोजित बैठकीत सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वेस्थानके हस्तांतरण प्रक्रियेप्रसंगी मध्य रेल्वेच्या वतीने अभिषेक कुमार गुप्ता, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर सिडकोचेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तक्रारींची दखल

नवी मुंबई परिसरातील रेल्वेस्थानकांच्या दुरवस्थेबाबत आणि तेथील अपुऱ्या प्रवासी सुविधांबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांकडे सातत्याने तक्रारी केल्या जातात. या समस्यांची दखल घेऊन म्हस्के यांनी ‘रेल्वे सल्लागार समिती’ चे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथील होणाऱ्या बैठकांमध्ये हा विषय वारंवार मांडला होता. स्थानकांची झालेली पडझड, देखभालीचा अभाव आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे सामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. अखेर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते.

Maharashtra TimesNavi Mumbai International Airport: विमानतळावर सहा महिन्यातचं पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण; ‘प्रवाशांची दिशाभूल होतेय’

सुविधा उपलब्ध होतील

तरघर, खारकोपर आणि बामनडोंगरी ही तीन स्थानके अधिकृतपणे रेल्वेच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहेत. उर्वरित स्थानकांबाबतही प्रक्रिया सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल. काही अतिरिक्त जागा, खुल्या जागा आणि त्यांच्या देखभालीसंदर्भातील विषयांवर सिडको आणि रेल्वे यांच्यात चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नव्हत्या. मात्र आता स्थानके रेल्वेच्या ताब्यात गेल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगल्या, दर्जेदार आणि सुसज्ज सुविधा मिळतील, असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा