Headlines

द्रौपदी मुर्मू यांचा कॉलम:महाप्रभू माझ्या जीवनातील चढ-उतारांचे नियंता‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎लहानपणापासून मला श्रीजगन्नाथांच्या अनेक प्रार्थना‎आणि भजने पाठ आहेत. शाळा आणि महाविद्यालयात ‎शिकत असताना मी भजने गात असे. जगन्नाथांचे भजन ‎गाऊन मला आनंद मिळायचा. महाप्रभू माझ्या अगदी‎जवळ असल्याची अनुभूती यायची. आता मी गाणी गात‎ नाही; पण सकाळ-संध्याकाळ महाप्रभूंचे स्मरण करून‎त्यांची भजने गुणगुणते. मला वाटते, महाप्रभू प्रत्येक क्षणी‎माझ्या आसपासच आहेत. संकटसमयी ते मला मदत‎करतात. भक्तकवी मधुसूदन राव यांचे हे गीत आजही मी‎मनोमन गाते :‎ “मेरे पास दिन-रात रहते हैं महाप्रभु परमेश्वर,‎यह बात याद कर हृदय में पूजूंगा उन्हें निरंतर।”‎
समजण्याइतकी मोठी होईपर्यंत मी जगन्नाथांना ओळखू‎लागले होते. आमच्या घरी त्यांची नेहमी चर्चा होत असे.‎गावातील प्रत्येक वाडीत त्यांच्या महिम्याचे वर्णन केले‎जाई. मी गावातील शाळेत शिकत असताना भक्त‎सालबेग यांची //”आहे नीड़ो शोइड़ो’ ही प्रार्थना गायली‎जायची. शाळेतील शिक्षक जगन्नाथांबद्दल अनेक गोष्टी‎सांगत असत. पुरीमध्ये खूप मोठे मंदिर आहे; इतके मोठे‎मंदिर दुसरीकडे नाही. त्या मंदिरात श्रीजगन्नाथ आपली‎बहीण सुभद्रा आणि थोरले भाऊ बलराम यांच्यासह पूजले‎जातात. जगन्नाथांचा वर्ण काळा, डोळे गोल-गोल.‎सुभद्रेचा वर्ण पिवळा, तर बलभद्र चांदणीच्या फुलासारखे‎शुभ्र. ती प्रतिमा एकदा पाहिली की कधी विसरता येत‎नाही. सर असेही सांगत असत की, जगन्नाथ म्हणजे‎‘महाप्रभू’, त्यांचा प्रसाद म्हणजे ‘महाप्रसाद’, त्यांचे मंदिर‎म्हणजे ‘मोठे मंदिर’, त्यांचा मार्ग म्हणजे ‘विशाल पथ’‎(‘बोडो दांडो’) आणि त्यांचा समुद्र म्हणजे ‘महोदधी’.‎ मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेड़ा गावापासून पुरुषोत्तम क्षेत्र‎पुरी खूप दूर होते. त्यामुळे ते पाहण्याची संधी मला कुठून ‎‎मिळणार? पण नंतर मी भुवनेश्वरला गेले आणि युनिट-2 ‎‎गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. वसतिगृहात राहू‎लागले. त्यानंतर मला पुरी, भुवनेश्वर व कोणार्क‎पाहण्याची संधी मिळाली. पहिल्या जगन्नाथ दर्शनाची ‎‎आठवण आजही माझ्या मनातून पुसली गेलेली नाही.‎इतके भव्य मंदिर, इतक्या भव्य देवमूर्ती! हे सारे विसरता‎येईल का? रथयात्रा विसरता येईल का? श्रीक्षेत्रात बारा ‎‎महिन्यांत तेरा सण-उत्सव साजरे होतात. पण रथयात्रेचे ‎‎वैभव काही वेगळे असते. वर्षभर भक्त मंदिरात जाऊन ‎‎महाप्रभूंचे दर्शन घेतात. पण वर्षातून एकदा महाप्रभू‎आपल्या भव्य मंदिरातून बाहेर येतात आणि ‘विशाल पथ’ ‎‎(‘बोडो दांडो’) वर येऊन भक्तांना दर्शन देतात. तीन‎रथांवर तीन देवता चक्रराज सुदर्शनासह गुंडिचा मंदिराकडे ‎‎प्रस्थान करतात. तेथे सात दिवस वास्तव्य करून पुन्हा‎परत येतात. महाप्रभूंचे हे महापर्व अतुलनीय आहे. ‎‎लहानपणापासून मी जगन्नाथांची भक्त आहे. ते सदैव‎माझे परम आराध्य आहेत. माझ्या जीवनातील‎चढ-उतारांचे नियंता तेच आहेत. माझ्या सुख-दुःखाचे ‎‎कर्ते-धर्ते तेच आहेत. आयुष्यात मी अनेक कष्ट सोसले ‎‎आहेत. त्या सर्व भीषण दुःखांतून महाबाहूंनीच मला बाहेर ‎‎काढले. कारण मी त्यांचीच मुलगी आहे! मला‎राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित करण्यात आले, त्या‎क्षणी मी महाप्रभूंचे स्मरण केले. ‘प्रभू, तुम्ही मला इतक्या‎उंच स्थानावर नेत आहात; प्रत्येक पावलावर मला आधार‎द्या, सदैव माझ्यासोबत राहा,’ हीच माझी प्रार्थना होती.‎त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आणि आजही ऐकत आहेत.‎राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून मी दिल्लीत असताना‎रथयात्रेचा महोत्सव आला. पण पुरीला जाणे शक्य नव्हते.‎रथयात्रेच्या दिवशी पहाटेच दिल्लीतील हौजखास येथील‎जगन्नाथ मंदिरात जाऊन मी महाप्रभूंचे दर्शन घेतले. माझे‎मन आनंदाने भरून गेले. त्यांच्या कृपेचा वर्षाव माझ्यावर‎झाला. मोठ्या आत्मविश्वासाने मी माझा उमेदवारी अर्ज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎दाखल केला. प्रचंड उत्साहाने निवडणूक प्रचारात‎सहभागी झाले. 25 जुलै 2022 रोजी संसदेच्या सेंट्रल‎हॉलमध्ये शपथ घेण्यासाठी जात असताना मी सतत‎जगन्नाथांची प्रार्थना करत होते. त्यांच्या आशीर्वादामुळे‎माझा शपथविधी अत्यंत उत्तम प्रकारे पार पडला. राष्ट्रपती‎म्हणून माझे पहिले भाषण करतानाही ते माझ्यासोबतच‎असल्याची मला जाणीव होत होती. पुरीला जाऊन‎महाप्रभूंचे दर्शन घेण्यासाठी माझे मन व्याकूळ झाले होते.‎दिवस जात होते; पण मला पुरीला जाता येत नव्हते. मला‎वाटले ते बोलवत नाहीत तोवर त्यांच्या भेटीस कोण जाऊ‎शकतो? मी मनोमन त्यांना म्हणाले, ‘प्रभू, माझ्याकडून‎काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. मला पुरीला‎बोलवा, दर्शन द्या.’ ते भावाचे भुकेले आहेत. माझी भावना‎त्यांना कशी कळणार नाही? काहीच दिवसांत पुरीला‎जाण्याचे ठरले. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 2022. पुरीत‎उतरल्यानंतर वाहनताफा श्रीमंदिराकडे निघाला.‎वाहनताफा पुरीच्या पवित्र विशाल मार्गावर पोहोचताच‎माझ्या मनात एक विलक्षण भावना दाटून आली. हा‎विशाल मार्ग महाप्रभू जगन्नाथांचाच आहे. येथे‎प्रोटोकॉलची काय गरज? पुरी क्षेत्रराज म्हणून प्रसिद्ध‎आहे. महाप्रभू देवाधिदेव आहेत. पुढचा विचार‎करण्याआधीच मी गाडी थांबवली. माझी गाडी थांबताच‎मागील सर्व वाहनेही थांबली. मी अनवाणी पायांनी त्या‎पवित्र मार्गावर चालू लागले. श्रीमंदिर दोन किलोमीटर दूर‎होते. मंदिरावरील नीलचक्र, पतितपावन ध्वजाकडे पाहत‎मी चालत राहिले. मार्गाच्या दोन्ही बाजूंना उभ्या‎बालकांना, महिलांना, युवक-विद्यार्थ्यांना व ज्येष्ठांना‎नमस्कार करत पुढे जात होते. माझे संपूर्ण लक्ष‎जगन्नाथांकडेच होते. श्रीमंदिराच्या सिंहद्वाराजवळ‎पोहोचताच मी स्वतःला सावरू शकले नाही. तोपर्यंत मी‎स्वतःलाच विसरले होते. त्या पवित्र मार्गावरील धुळीत‎साष्टांग दंडवत घालून मी महाप्रभूंना प्रणाम केला.‎मंदिरात प्रवेश केला. गर्भगृहात चतुर्धा मूर्तींचे दर्शन होताच‎मी आनंदाने भारावून गेले. महाप्रभू हे जगाचे नाथ आहेत.‎अनाथांचेही नाथ आहेत. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी ते‎सदैव तत्पर असतात. म्हणूनच त्यांच्या गोल-गोल‎डोळ्यांच्या पापण्या कधी मिटत नाहीत. ते सर्वांकडे समान‎दृष्टीने पाहतात.समतेचा मंत्र देतात. त्यांच्या कृपेनेच मी‎समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित‎केले आहे. हात जोडून मी प्रार्थना केली, ‘हे महाबाहू,‎तुमच्या आशीर्वादाने माझ्यातील ही समर्पणाची भावना‎कायम राहू दे. हे कृपानिधी, देश, जगावर कृपाछाया राहू‎दे!’ हे म्हणताना मी भक्तिभावाने पूर्णपणे भारावून गेले.‎ रथयात्रेचे वैभव तर निराळे,‎अविस्मरणीय आहे…‎पहिल्या जगन्नाथ दर्शनाची आठवण‎आजही मनातून पुसली नाही. इतके भव्य‎मंदिर, इतक्या भव्य देवमूर्ती! हे सारे कधी‎विसरता येईल का? त्यांची रथयात्रा‎विसरता येईल का? श्रीक्षेत्रात बारा‎महिन्यांत तेरा सण-उत्सव साजरे होतात.‎पण रथयात्रेचे वैभवच वेगळे असते.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत