Headlines

द्रविडने केलं, पुजाराने केलं, आता पडिक्कलचाही ‘वन मॅन शो’, श्रीलंकेविरुद्ध 9 वर्षांनंतर कोणता मोठा विक्रम?


Devdutt Padikkal Record News : गॉल कसोटीत देवदत्त पडिक्कलने १६७ धावांची शानदार खेळी करत मोठा विक्रम केला. त्याने राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजाराच्या खास यादीत स्थान मिळवलं.

Devdutt Padikkal 150
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : श्रीलंका आणि भारत यांच्यात गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याने इतिहास रचला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाबाद शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या पडिक्कलने, दुसऱ्या दिवशीही आपला धडाका सुरूच ठेवला. त्याने दुसऱ्या दिवशी आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

श्रीलंकेविरुद्ध दीडशतक झळकावणारा तिसरा भारतीय

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध १५० धावांचा टप्पा ओलांडताच एका नव्या ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर (No. 3) फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध १५० हून अधिक धावांची खेळी करणारा तो केवळ तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम केवळ राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा या दोन महान फलंदाजांनाच करता आला होता.

  • २००९ मध्ये ‘द वॉल’ राहुल द्रविडने श्रीलंकेविरुद्ध १७७ धावांची शानदार खेळी केली होती.
  • २०१७ मध्ये गॉलच्या याच मैदानावर चेतेश्वर पुजाराने १५३ धावा कुटल्या होत्या.
  • आता २०२६ मध्ये देवदत्त पडिक्कलने या दिग्गजांच्या यादीत आपले नाव कोरले आहे.

Maharashtra TimesTeam India WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा उलटफेर, भारतासाठीही समीकरण बदललं, पाहा नेमकं कसं?

१६७ धावांवर खेळी संपुष्टात

दुसऱ्या दिवशी अतिशय दमदार आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करत असलेला देवदत्त पडिक्कल १६७ धावांच्या धावसंख्येवर बाद झाला. त्याच्या या मॅरेथॉन खेळीत १५ खणखणीत चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तो बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ५ बाद ३५७ अशी होती.

भारताची ४०० पार मजल

पडिक्कल बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल आणि मानव सुथार यांनी भारतीय डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी संयमाने खेळत भारतीय संघाची धावसंख्या ४०० च्या पार पोहोचवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना भारताने तआतापर्यंत ६ गड्यांच्या मोबदल्यात ४०० धावांचा टप्पा ओलांडला असून, या सामन्यात टीम इंडियाने पूर्णपणे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Maharashtra TimesKambli Web Series : सचिनचा जीवलग ते मैत्रीतील दुरावा; ‘कांबळी’चं वादळी आयुष्य आता OTTवर, भूमिकांबाबत उत्सुकता, कुठे पाहता येणार?

पहिल्या दिवशीही पडिक्कलने रचले होते विक्रम

याच कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पडिक्कलने २१ व्या शतकात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर शतक झळकावणारा सौरव गांगुलीनंतरचा (२००२) केवळ दुसराच डावखुरा फलंदाज बनण्याचा मान मिळवला होता. त्याशिवाय देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तसेच, सप्टेंबर २०२४ मध्ये शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर, गेल्या १९ कसोटी सामन्यांपासून नंबर-३ वर असलेला शतकाचा दुष्काळही पडिक्कलने आपल्या या खेळीने संपुष्टात आणला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा