Headlines

तुम्हाला PF कापल्याचा मेसेज येत नाही का? काळजी करू नका! मोबाईल नंबर लिंक करण्याची पद्धत एकदम सोपी। Maharashtra Times


दरमहा पगारातून PF कापला जाऊनही मोबाईलवर मेसेज न येणे ही अनेक नोकरदारांची मोठी समस्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे PF खात्याशी चालू मोबाईल नंबर लिंक नसणे होय. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ने EPFO अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अवघ्या 5 मिनिटांत मोबाईल नंबर लिंक किंवा अपडेट करण्याची अत्यंत सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

PF। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुमच्या PF खात्याचे नियमित अपडेट्स आणि बॅलन्स मेसेज मिळवण्यासाठी UAN पोर्टलवर मोबाईल नंबर नोंदवणे आवश्यक आहे. EPFO च्या युनिफाइड मेंबर पोर्टलवर लॉगिन करून ‘मॅनेज’ पर्यायांतर्गत कॉन्टॅक्ट डिटेल्स बदलून कर्मचारी घरबसल्या आपला चालू नंबर लिंक करू शकतात. हा नंबर आधार कार्डशी लिंक असणे मात्र अत्यंत अनिवार्य आहे.

तुम्ही नोकरी करत असाल आणि दरमहा तुमच्या पगारातून PF (Provident Fund) कापला जात असेल, परंतु तुम्हाला त्याचा मोबाईलवर मेसेज (SMS) येत नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. EPFO कडून PF जमा झाल्याचा मेसेज न येण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या PF खात्याशी (UAN) तुमचा चालू मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा तो जुना असणे.

कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी EPFO ने ऑनलाईन पोर्टलवर मोबाईल नंबर अपडेट किंवाचेंज करण्याची अत्यंत सोपी प्रक्रिया दिली आहे. तुम्ही घरबसल्या केवळ 5 मिनिटांत हा नंबर कसा लिंक करू शकता, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

मोबाईल नंबर लिंक/बदलण्याची सोपी ऑनलाईन पद्धत

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी EPFO च्या अधिकृत Unified Member Portal वर जा.
  • लॉगिन करा: तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा (Captcha) कोड टाकून ‘Sign In’ करा.
  • ‘Manage’ पर्याय निवडा: लॉगिन झाल्यानंतर वरच्या बाजूला दिलेल्या मेनू बारमधील ‘Manage’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘Contact Details’ वर जा: ड्रॉपडाउन मेनूधून ‘Contact Details’हा पर्याय निवडा.
  • नंबर बदला: येथे तुमचा जुना मोबाईल नंबर दिसेल. त्यासमोरील ‘Check Mobile Number’ च्या बॉक्सवर टिक करा.
  • नवा नंबर टाका: आता तुम्हाला जो नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, तो दोनदा (New Mobile Number आणि Re-enter Mobile Number) टाईप करा.
  • ओटीपी पडताळणी: यानंतर ‘Get Authorization Pin’ वर क्लिक करा. तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
  • सबमिट करा: तो ओटीपी टाकून ‘Save Changes’ वर क्लिक करा. तुमचा नवीन मोबाईल नंबर पीएफ खात्याशी त्वरित लिंक होईल.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या

आधार कार्डशी लिंक असावा: तुम्ही जो मोबाईल नंबर पीएफ खात्याशी लिंक करत आहात, तोच नंबर तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) देखील लिंक असणे अनिवार्य आहे. दोन्ही नंबर वेगळे असल्यास ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

नाव आणि जन्मतारीख: तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख ही पीएफ खात्यावरील माहितीशी जुळणारी असावी.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा