तुकाराम मुंढेंविरोधात २९ कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार, पुन्हा बदलीचे संकेत? – 29 officers fda laboratory in chhatrapati sambhajinagar have lodged a complaint against tukaram mundhe
तुकाराम मुंढेंविरोधात २९ कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार, पुन्हा बदलीचे संकेत? – 29 officers fda laboratory in chhatrapati sambhajinagar have lodged a complaint against tukaram mundhe
प्रशासनातील शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे जिथे जातात, तिथे धडाकेबाज कारवाया आणि वाद हे समीकरण ठरलेलं असतं. २५ मे रोजी त्यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA च्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसांतच राज्यभरात त्याच्या कारवायांची चर्चा सुरु झाली. राज्यात गेल्या काही महिन्यात एफडीएने कारवाईचा धडाका लावला असून अगदी पान टपऱ्यांपासून ते पंचतारांकीत हॉटेलपर्यंतच्या आस्थापनांवर कारवाई केली आहे. गुटखा माफिया, दूध भेसळखोर, नियमांचे उल्लंघन करणारे रेस्टॉरंट्स, कॅन्टीन, अगदी पंचतारांकित हॉटेल्स आणि व्हीआयपी क्लब्ससुद्धा मुंढेंच्या रडारवर आले. पण आता याच तुकाराम मुंढेंना आता डबल धक्का बसला आहे! एका बाजूला अन्न आणि औषध प्रशासनाच्याच प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात थेट खात्याच्या मंत्र्यांकडे तक्रार केली आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या धडक कारवायांच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नेमकं काय घडलंय? कर्मचाऱ्यांचे तुकाराम मुंढेंवर आक्षेप काय आहेत? आणि मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला काय फटकारलंय? तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात..