Headlines

जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल 4.27 लाख नावे पडताळणी बाहेर:जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल‎ 4.27 लाख नावे पडताळणी बाहेर‎



जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण प्रक्रियेत तब्बल ४ लाख २७ हजार ५८४ मतदारांची पडताळणीबाहेर (अनकलेक्टेबल) आहेत. जिल्ह्यातील एकूण ३८ लाख १० हजार १०२ मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण ११.२ टक्के आहे. म्हणजेच जिल्ह्यातील प्रत्येक १०० मतदारांपैकी सुम

.

जिल्ह्यातील सर्व १२ विधानसभा मतदारसंघांतील मतदार अर्जांच्या डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. १७ ऑगस्टपर्यंत ३८ लाख १० हजार १०२ मतदारांची डिजिटल नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख २७ हजार ५८४ नोंदी ‘अनकलेक्टेबल’ श्रेणीत आली आहे. मतदारांच्या डिजिटल नोंदणीचे काम ३ हजार ८३० बीएलओंच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.

मतदारसंघनिहाय पाहता अहिल्यानगर शहरात सर्वाधिक ६९ हजार ११७ नावे ‘अनकलेक्टेबल’ आहेत. या मतदारसंघातील ३ लाख १५ हजार २६४ मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे २१.९ टक्के आहे. म्हणजे शहरातील जवळपास प्रत्येक पाचव्या मतदाराची नोंद ‘अनकलेक्टेबल’ अशी आहे. याउलट अकोले मतदारसंघात सर्वाधिक कमी १६ हजार ४२८ नावे ‘अनकलेक्टेबल’ असून तेथील २ लाख ६८ हजार ६८१ मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ६.१ टक्के आहे. शिर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, पारनेर यांसह अन्य मतदारसंघांतही हजारो नावे ‘अनकलेक्टेबल’ आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. आता २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर दावे-हरकती मागवण्यात येणार आहेत. २२ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकतींवर निर्णय घेऊन २७ ऑक्टोबरला अंतिम छायाचित्र मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ही आहेत कारणे शहरी भागातील रोजगारासाठीचे स्थलांतर आणि घरबंद असण्यामुळे अहमदनगर शहरात “अनकलेक्टेबल’ नोंदींचे प्रमाण सर्वाधिक (२१.९%) दिसते, तर ग्रामीण व आदिवासी अकोले मतदारसंघात स्थिर रहिवासामुळे हे प्रमाण कमी आहे. आगामी निवडणुकीत बोगस मतदानाला आळा बसावा यासाठी ही प्रशासकीय पडताळणी अत्यंत महत्त्वाची ठरेल, परंतु खऱ्या मतदारांचे नाव सुटणार नाही याची दक्षता घेणे हे प्रशासनासमोरील मुख्य आव्हान असेल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत