Jalgaon to Sambhajinagar Expressway:उत्तर महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या महमार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे. थेट समृद्धी महामार्गाला जोडलेल्या खान्देश एक्सप्रेवेमुळे प्रवासात वेळ वाचणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: खान्देश एक्सप्रेसवेमुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवासाचा नकाशाच बदलणार आहे. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्गासाठी सर्वेक्षण पूर्ण झालं असून अंतिम आराखडा तयार आहे. धारणगावातून अंतिम मार्ग बांधण्याचं नियोजन आहे. जळगाव ते संभाजीनगर अंतर आता फक्त एका तासावर येणार आहे.
कोणत्या गावांमधून मार्ग जाणार?
खान्देश एक्सप्रेसवे सहा पदरी मार्ग असणार आहे. संभाजीनगर येथे थेट समृद्धी महामार्गाला जोडून पुढे प्रवास करणं शक्य होणार आहे. यामुळे जळगाव ते मुंबई अंतर केवळ पाच तासांता गाठता येणार आहे. हा मार्ग एकूण 105 किलोमीटर लांब असेल. जळगाव, धरणगाव, जामनेर/पहुर, फर्दापूर आणि छत्रपती संभाजीनगर असा संपूर्ण मार्ग असेल. त्याशिवाय हा मार्ग नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालाही थेट जोडलेला असेल. सध्या कोणत्या गावांमधून हा मार्ग जाणार हे ठरवलं असून सविस्तर प्रकल्प आराखडा MSRDC तयार करत आहे.
जळगाव ते मुंबई प्रवासात तब्बल 3 ते 4 तास वेळ वाचणार आहे. जळगाव शहराच्या हद्दीत हा महामार्ग सुरू होईल. त्यापुढे धरणगावपासून पुढे जामनेर किंवा पहुरला जोडेल. फर्दापूर जवळूनही हा महामार्ग जाणार आहे. याच भागात अजिंठा लेणी, जंगल आणि डोंगराळ भाग आहे. या परिसराचं संरक्षण करून मार्गाचा आराखडा तयार केला जाणार आहे. यापुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये समाप्त होताच हा मार्ग समृद्धी महामार्गाला जाऊन भेटणार आहे. खेडेगावांपासून बाहेर हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गावांमध्ये न शिरता थेट प्रवास करणं शक्य होणार आहे.
कसा फायदा होणार?
सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केल्यानंतर अंतिम गावांची नावं समोर येतील. पण सध्या मुख्य गावांचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. जळगावमधून दररोज मोठ्या प्रमाणात केळी, कापूस आणि भाज्या मुंबईत आणल्या जातात. मुंबईच्या दिशेने जाणारे हे मार्ग वळणदार असून नेहमी वाहतूक कोंडी होते. या द्रुतगती महामार्गामुळे हे समीकरण पूर्णपणे बदलते. त्यामुळे हा सर्व माल मुंबई आणि नागपूरसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये लवकर पोहोचणार आहे. कोल्ड-चेन ऑपरेटर्समुळे वेळही वाचतो.
खान्देशातून येणारा कच्चा माल संभाजीनगरमधील ऑटो आणि इंजिनीअरिंग युनिट्समध्ये लवकरात लवकर पोहोचवणं शक्य होणार आहे. त्याशिवाय समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी अजिंठा आणि वेरूळसारख्या पर्यटन स्थळांवर पोहोचणं सोपं होणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यापर्यंत प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे. सध्या जळगाववरून मुंबईला जाण्यासाठी मालेगाव आणि नाशिकमार्गे 7 ते 8 तास लागतात. आता जळगाववरून थेट छत्रपती संभाजीनगरमार्गे 5 तासांत मुंबईपर्यंच पोहोचता येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा