मुंबई : काल भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताने इग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट- रोहित यांची जादू चालली नाही. ते स्वस्तात माघारी परतले, पण या सामन्यात अक्षर पटेलसोबत वॉशिंग्टन सुंदरने १०२ धावांची केलेली भागीदारी चर्चेत आहे. कर्णधार शुभमन गिल याच्या ८० धावांनंतर या दोघांनी भारताची खेळी सावरली. त्यांनी भारताला लक्ष्यापर्यंत पोहोचवलं. या सामन्यात अक्षरने ५७ धावा बनवल्या, तर सुंदरने ५२ धावा केल्या. दोघेही नाबाद होते.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या या खेळीबद्दल सामन्यानंतर भाष्य केलं आहे. तो म्हणाला की, विविध भूमिका साकारणे मला रोमांचक वाटते. फार कमी खेळाडूंना टीममध्ये विविध संधी मिळतात. मला विविध परिस्थितीत संघासाठी खेळण्याची संधी मिळते. संघाला जिंकवण्यासाठी मी शक्य ते सर्व काही करत असतो. विविध परिस्थितीत, खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळण्याचा अनुभव हा रोमांचक असतो, असं तो म्हणाला.
या संवादात पुढे तो म्हणाला की, माझ्या फलंदाजीत आत्मविश्वास वाढवण्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे योगदान आहे, तसेच त्याने गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या प्रभावाचाही यावेळी उल्लेख केला.
गौती भाई मला नेहमी सांगायचे की मी माझ्या फलंदाजीतून काय करुन दाखवू शकतो, संघासाठी कसं योगदान देऊ शकतो. त्यांनी मला माझा खेळ समजावला. त्यामुळेच आज हे शक्य झालं. त्याशिवाय गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी मला एक व्यक्ती आणि एक क्रिकेटपटू म्हणूनही स्वतःला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत केली, असे सुंदरने सांगितले.
त्याने पुढे सांगितले की, अष्टपैलू खेळाडू असणे हे माझ्यासाठी एक मोठे भाग्य आहे. म्हणजे, संघात जेवढे जास्त अष्टपैलू खेळाडू असतील, तेवढा जास्त फायदा संघाला होतो, कारण त्यामुळे तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकता. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दररोज सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे, स्वतःचा खेळ समजून घेणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हे मला महत्त्वाचे वाटते. त्याशिवाय अधिक सामने खेळल्यानेही मदत मिळते. तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जायला मिळते. त्यामुळे तुम्ही खरोखर काय करु शकता हे कळतेच शिवाय या प्रवासात तुम्ही खूप शिकतासुद्धा, असं वॉशिग्टंन यावेळी म्हणाला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा