जर उद्यापर्यंत ई-केवायसी केली नाही तर…
जी मंडळी दिलेल्या मुदतीच्या आत ई-केवायसी करण्यात असक्षम ठरेल त्यांना भविष्यात काही परिणामांना सामोरे जावे लागू शकते. अशा मंडळींना LPG गॅस सिलेंडर डोमेस्टिक रेटमध्ये मिळवण्यात अडचण येऊ शकते. कदाचित त्यांना कमर्शियल रेटमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर घ्यावे लागेल किंवा त्यांचे एलपीजी कनेक्शन काही काळासाठी सस्पेंड केला जाईल. जर तुम्ही ई-केवायसी करण्यासाठी उद्याची तारीख चुकलात तर घाबरून जाण्याचे इतके कारण नाही कारण ई- केवायसी केल्यानंतर सस्पेंड करण्यात आलेले कनेक्शन पुन्हा सुरू करण्यात येईल किंवा तुम्हाला मिळणाऱ्या सर्व सुविधा पुन्हा पूर्ववत होतील.
अचानक ई-केवायसी करण्याचे काही विशेष कारण
डोमेस्टिक एलपीजीच्या गैरवापर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बाजारात मिळणाऱ्या डुप्लिकेट किंवा फेक कनेक्शन वर आळा घालण्यासाठी ग्राहकांचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. त्यामुळे एलपीजी कंपन्यांनी ग्राहकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
अगदी घरबसल्याही करू शकता ई-केवायसी
जर तुम्हाला ऑनलाईन ई-केवायसी करायची असेल तर संबंधित एलपीजी कंपनीचा मोबाईल एप्लीकेशन उघडा. ॲप उघडल्यावर तिथे ई-केवायसी ऑप्शन निवडा. आधार कन्सेंट द्या. फेस ऑथेंटीकेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशन होईल आणि तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.
घर भाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरताय? सावध रहा! आधी होणारे नुकसान जाणून घ्याजर तुम्हाला ऑनलाईन ई-केवायसी करण्यात अडचण येत असेल तर जवळच्या संबंधित एलपीजी कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन प्रक्रियेचा लाभ घेऊ शकता.
Indane Gas च्या ग्राहकांनी लक्ष द्या
Indane Gas च्या ग्राहकांनी ऑनलाइन ई-केवायसीसाठी आधी IndianOil ONE App डाउनलोड करा. त्यानंतर संबंधित एलपीजी खात्याने लॉगिन करा. ई-केवायसी निवडा आणि आधार कन्सेंट देऊन फेस स्कॅन करवून घ्या. याने आधारच्या आधारे ग्राहकाची ओळख वेरिफाय होईल आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
HP Gas च्या ग्राहकांनी लक्ष द्या
HP Gas च्या ग्राहकांनी ऑनलाइन ई-केवायसीसाठी आधी HP Pay App डाउनलोड करा. त्यानंतर संबंधित एलपीजी खात्याने लॉगिन करा. ई-केवायसी निवडा आणि आधार कन्सेंट देऊन फेस स्कॅन करवून घ्या.
Bharat Gas च्या ग्राहकांनी लक्ष द्या
Bharat Gas च्या ग्राहकांनी ऑनलाइन ई-केवायसीसाठी आधी Hello BPCL App डाउनलोड करा. त्यानंतर संबंधित LPG खात्याने लॉगिन करा. ई-केवायसी निवडा आणि आधार कन्सेंट देऊन फेस स्कॅन करवून घ्या.

