![]()
जी बौद्धिक कामे पूर्वी फक्त माणसे करू शकत होती, तीआता ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय)करू शकेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेआशा आणि चिंता या दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.गमतीची गोष्ट म्हणजे, एजीआयचे फायदे आणि तोटे यांचेअत्यंत सूक्ष्म विश्लेषण ओपनएआयचे सीईओ सॅमआल्टमन यांनी केले आहे. आपल्या पोस्टमध्ये आल्टमनयांनी अशी शंका व्यक्त केली आहे, जी तंत्रज्ञानाबाबतआशावादी असलेल्या लोकांमध्ये कमीच पाहायला मिळते.त्यांनी लिहिले की, ‘एजीआयने मानवजातीला विश्वात भरभराटीची शक्ती द्यावी, अशी आमचीइच्छा आहे.’ पण त्याच वेळी त्यांनी हेही मान्य केले की, असे करण्यासाठी ‘मोठ्या जोखमींचा सामना’ करावा लागेल. ज्ञानोदय काळानंतर मानवतेमध्ये अंधश्रद्धा आणि कर्मठपणाच्या जागी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. वैज्ञानिक प्रगती नैसर्गिकरीत्या फायदेशीर असते, हाविश्वासही वाढला आहे. या विचारसरणीनुसार, अणुबॉम्बसारखे शोध विनाशकारी असले तरी, निसर्गाचीसखोल समज देणारे विज्ञान नक्कीच मानवाच्याकल्याणासाठी सक्षम आहे. मात्र, विज्ञानावरील अटळविश्वासही कधी‘कधी एक प्रकारची कर्मठ धारणा बनूशकतो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. 2024 च्या एका शोधनिबंधात मी आणि यॉर्गेन वेइबुल यांनी‘गेम थिअरी’चा वापर करून या प्रवृत्तीचा अभ्यास केलाहोता. जेव्हा माणसे अशा अनिश्चित परिस्थितीतएकमेकांशी संवाद साधतात, जिथे एखाद्या व्यक्तीसाठीकाय योग्य आहे, हे समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावरअवलंबून असते – तेव्हा एखादा नवीन वैज्ञानिक शोध‘प्रिझनर्स डिलेमा’ सारखी परिस्थिती निर्माण करू शकतो.यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आणि तार्किक निर्णयशेवटी अशा परिणामांकडे नेतो, जे सर्वांसाठी वाईट ठरतात.एजीआयचा उदय ही अशीच एक घटना ठरू शकते. आणि म्हणूनच आल्टमन यांची शंका रास्त आहे. तेम्हणतात की, एजीआय प्रत्येक व्यक्तीला अविश्वसनीयक्षमता देऊ शकते, पण यामुळे गंभीर अपघात आणिसामाजिक गोंधळही निर्माण होऊ शकतो. अशा वेळी‘नॉलेज कर्स’चा (ज्ञानाचा शाप) धोका कमी करणे, हेमोठे आव्हान आहे. भविष्य अनिश्चित असल्याने, आपणविचारपूर्वक अंदाज वर्तवणे आणि सावधगिरीचे उपाययोजणे, हेच सर्वात उत्तम ठरेल. या आव्हानांना केवळखासगी क्षेत्राच्या भरवशावर सोडून चालणार नाही. यावरमात करण्यासाठी संसाधनांचे फेरवाटप आणि आंतरराष्ट्रीयसहकार्य यांची काही प्रमाणात गरज लागेल. कदाचित एजीआयचा सर्वात गंभीर परिणाम श्रमाचीमागणी कमी होणे हा असेल. पण याचा अर्थ असा नाही कीलोकांकडे करण्यासाठी काहीच उरणार नाही. खरं तर,लोक पूर्वीपेक्षा जास्त मोकळ्या वेळेचा आनंद घेऊशकतील. पण श्रमाची व्याख्या जर केवळ ‘पगारासाठीकेलेले काम’ अशी केली, तर एजीआय अशी दुनियानिर्माण करू शकते जिथे श्रम अनावश्यक ठरेल, कारणयंत्रे जवळपास प्रत्येक क्षेत्रात मानवापेक्षा चांगली कामगिरीकरतील. बहुतेक प्रौढ लोक आपल्या उत्पन्नासाठी कामावरअवलंबून असतात. त्यामुळे असा बदल अब्जावधीलोकांना उपजीविकेपासून वंचित करू शकतो. म्हणूनचआल्टमन यांनी ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ची(यूबीआय) वकिली केली आहे, जी प्रत्येक माणसालाकिमान जगण्याची हमी देईल. पण एजीआयचा प्रभावनोकऱ्या आणि उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन जागतिकहुकूमशाहीचा मार्गही मोकळा करू शकतो. जर याप्रणालींचे नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हातात राहिले,तर काही मोजके अब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. एजीआयपर्यंत सर्वांची पोहोचअसणे हा समस्या सोडवण्याचा केवळ एक भाग आहे. पैसाआणि सत्तेचे अति-केंद्रीकरण होणार नाही, हे सुनिश्चितकरणे तितकेच महत्त्वाचे आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) जर या प्रणालींचे नियंत्रण काही मोजक्यालोकांच्या हातात राहिले, तर काही मोजकेअब्जाधीश संपूर्ण मानवजातीवर अफाटसत्ता मिळवू शकतात. पैसा आणि सत्तेचेअति-केंद्रीकरण होणार नाही, हेसुनिश्चित करणेही महत्त्वाचे आहे.
Source link
कौशिक बसू यांचा कॉलम:‘सुपर स्मार्ट’ प्रणालीचे नियंत्रण नेमके कुणाच्या हाती असावे?
