Headlines

ऑपरेशन टायगरनं ठाकरेंपेक्षा जास्त फडणवीसांची धाकधूक वाढणार? ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नेमकं काय? – what is operation devendra fadnavis explain in marathi


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ऑपरेशन देवेंद्र फडणवीस…एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उरलेले खासदार आणि आमदार आपल्या गोटात ओढून ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, या ‘ऑपरेशन टायगर’च्या आडून पडद्यामागे दुसरंच एक ऑपरेशन सुरू आहे, ज्याचा उल्लेख खुद्द उद्धव ठाकरेंनी केलाय. ते म्हणजे—’ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे ६ खासदार फोडल्यानंतर आधी राज ठाकरेंनी याकडे लक्ष वेधलं आणि नंतर उद्धव ठाकरेंनी उघड उघड हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगून टाकलं. सचिन अहिर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर आदित्य ठाकरेंनीही तोच पुनरुच्चार केला. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन देवेंद्र फडणवीसची चर्चा सुरु झाली. भाजपनं २०२९ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरु केली आहे. पण ही तयारी फक्त विरोधकांना हरवण्यासाठी नाही, तर पक्षांतर्गत भविष्यातील आव्हाने संपवण्यासाठी देखील आहे, अशी चर्चा आहे. जे नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत घडलं, तेच आता देवेंद्र फडणवीसांसोबत घडणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं, तेच एकेकाळी नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये केलं होतं. उद्योगपतींशी जवळीक, RSS चा भक्कम पाठिंबा आणि स्वतःची एक ‘डेव्हलपमेंट मॅन’ म्हणून प्रतिमा. पण आज दिल्लीत बसलेले अमित शाह फडणवीसांच्या वाढत्या प्रभावामुळे चिंतेत आहे का? ‘ऑपरेशन टायगर’ने उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी जास्त वाढवली आहे का? आणि ऑपरेशन फडणवीसच्या नेमक्या चर्चा का सुरु आहेत? तेच या व्हिडिओतून समजून घेऊया…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत