Headlines

heavy rainfall effect school holiday announced in palghar and badlapur katai road closed in dombivli


ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे कल्याण डोंबिवली आणि पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघरमध्ये उद्याही पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर डोंबिवलीत बदलापूर-काटई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

rain update
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे/पालघर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाण, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली शहराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. तसेच पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडला आहे. याशिवाय उद्याही दिवसभर जोरदार पावसाची शक्यता आहे. कारण हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाचा हा अंदाज पाहता पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

शीळफाटा परिसरात प्रचंड पाणी

कल्याण आणि डोंबिवली शहरांतही आज जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्रीपासून कल्याण आणि डोंबिवली शहरांत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे शीळफाटा परिसरात वाहनं पाण्याखाली गेले आहेत. तसेच शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

प्रशासनाला रस्त्याचा डिव्हायडर तोडावे लागले

याच शीळ रोडच्या पुढे काटई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं होतं. इथल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रशासनाला चक्क रस्त्यावरील डिव्हायडर तोडावा लागला आहे. यानंतर बदलापूर-काटई रस्त्यावर पुढे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

बदलापूर-काटई रस्ता वाहतुकीसाठी बंद

नेवाली नाका परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणासाठी बदलापूर-काटई रस्ता हा वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला. पाऊस कमी झाला किंवा थांबला आणि पावसाच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान,नेवाली नाका परिसरात वाहतूक पोलीस पोहोचले आहेत. त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

कल्याण पूर्वेत इमारतीच्या तळमजल्यावर पाणी साचलं

मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील साई विहार संकुल इमारतीच्या तळमजल्यावर पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे घरातील फर्निचर आणि इतर सामानाचे नुकसान झाले आहे. पाऊस असाच सुरु राहीला तर या परिसरातील घरांमध्ये कंबरेइतके पाणी साचण्याची भीती आहे.

वाहतुकीवर मोठा परिणाम

कल्याण डोंबिवलीत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होताना दिसत आह. पाऊस असाच सुरु राहीला तर वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. दरम्यान, प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जात आहे.

शिळफाटा-मुंब्रा रोड पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे ठाणे-मुंब्रा-शिळफाटा रोडला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या भागातील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. यामुळे वाहनचालकांना आपली वाहनं घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय कल्याण पूर्वेतील मलंगडगड रोडवरदेखील अशीच काहीशी अवस्था झाली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा