खासदारांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही फुटणार असा दावा केला जातोय. सचिन अहिर यांच्यानंतरही आणखी नेते शिवसेनेत येणार असल्याचं सांगितलं जातंय. परभणीतील स्था, स्व. संस्थेच्या विधानपरिषदेचे आमदार सईद खान यांनी मोठं वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरे सुद्धा शिवसेनेत येतील, पण त्यांना घेऊ नका असे आवाहन खान यांनी केले. यापुढेही अनेक पक्षप्रवेश होणार असून आदित्य ठाकरेही शिवसेनेत येऊ शकतात असे ते म्हणाले. सगळे ठाकरेंना सोडून आलेत, तिथे वाईट परिस्थिती आहे, असेही खान यांनी म्हटले.