Mandi House Hindi play :हिंदी रंगभूमीवरही सध्या वेगवगेळे विषय हाताळले जात आहेत. ‘मंडी हाऊस’ या अशाच एका वेगळ्या विषयावर आधारलेल्या नाटकाची चर्चा सुरू आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आज लेख लिहितं, चित्रं तयार करतं, संगीत रचतें. मग उद्या ती नाटकही लिहू शकेल का? आणि जर लिहिलंच, तर मानवी भावना, अनुभव आणि संवेदनांनी विणलेली रंगभूमीची जादूही ती निर्माण करू शकेल का? ‘ मंडी हाऊस ’ हे नाटक नेमकं याच प्रश्नांचा शोध घेत तंत्रज्ञान आणि मानवी सर्जनशीलतेमधील नात्यावर विचारमंथन घडवते.
नॅन्सी गिल लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाची कथा २०३० सालात घडते. ‘मोहे पनघट पे’ या गाण्यावर उभ्या केलेल्या स्वप्नदृश्यातून सुरुवात होताच प्रेक्षक एका अशा जगात प्रवेश करतात, जिथं AI केवळ एक साधन नसून क्रिएटिव्ह प्रोसेसचाच अविभाज्य भाग बनलेला आहे. मात्र, नाटक AIचं अंधसमर्थनही करत नाही आणि त्याला खलनायकही ठरवत नाही. उलट, कलाकार, लेखक आणि प्रेक्षक यांच्या बदलत्या नात्याकडं समतोल दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करते.
नाटकाची खरी ताकद त्याच्या सहज आणि प्रभावी मांडणीत आहे. AIमुळे निर्माण होणारे प्रश्न, मौलिकतेचं महत्त्व, सर्जनशीलतेचं बदलतं स्वरूप आणि तंत्रज्ञानावर वाढत चाललेलं डिपेंडन्सी यांचा वेध संवादांतून घेतला जातो. त्यामुळे आशय गंभीर असला तरी तो कुठेही उपदेशात्मक वाटत नाही.
Akanksha Chamola: लग्नाआधी स्त्रीयाचं आकर्षण, काही मुलींसोबत संबंध; गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाचा आणखी एक खळबळजनक खुलासा
नाटकातील AIच्या बिघडण्याच्या प्रसंग विशेष लक्ष वेधून घेतो. तांत्रिक अचूकतेचा दावा एका क्षणात कसा कोसळू शकतो आणि त्यातून विनोदाची निर्मिती कशी होते, हे या प्रसंगातून प्रभावीपणे उलगडतं. या विनोदामागे मानवी निर्णयक्षमता आणि यंत्रांवरील अतिरेकी विश्वास यांच्यातील संघर्षही अधोरेखित होतो.
अब्बास सय्यद आणि नॅन्सी गिल यांचा संयत अभिनय नाटकाला भावनिक खोली देतो. कौशिक प्रजापती आपल्या अचूक कॉमिक टायमिंगमुळे कथानकाला हलकाफुलका स्पर्श देतात. त्याला ओरिजिनल स्कोअर आणि लाईव्ह व्होकलची लाभलेली साथ काही प्रसंग अधिक परिणामकारक बनवते.
‘MPSC’ चं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा संघर्ष, अंजिक्य राऊतच्या मराठी सिनेमाची चर्चा, पहिल्यांदाच दिसला वेगळ्या भूमिकेत
आज AI झपाट्याने विकसित होत असताना रंगभूमीची खरी ताकद तंत्रज्ञानात नसून कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात घडणाऱ्या जिवंत संवादात आहे, याची जाणीव ‘मंडी हाऊस’ करून देते. प्रश्नांची तयार उत्तरं देण्यापेक्षा विचारांना चालना देणं, हीच या नाटकाची खरी ताकद आहे. बदलत्या काळात तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांचा समतोल कसा साधायचा, हा महत्त्वाचा प्रश्न हे नाटक प्रेक्षकांसमोर शांतपणे, पण प्रभावीपणे ठेवते.

