Headlines

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला अंबानी कुटुंबाची हजेरी, वाटेत झाड कोसळल्यानं गाड्यांचा ताफा थांबला, राज ठाकरेंचीही उपस्थिती


मुंबई: मुंबईसह इतर शहरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. आमिर आणि ब्युटी व वेलनेस उद्योजिका गौरी स्प्रॅट यांचं रजिस्टर मॅरेज मॅरेज त्यांच्या मुंबईतल्या घरी पार पडत आहे. अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक वातावरणात होणाऱ्या या लग्नाला खान याच्या पाली हिल येथील निवासस्थानी सुरुवात झाली असून, बॉलिवूड आणि उद्योग जगतातील दिग्गज मंडळींनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. अंबानी कुटुंब देखील या खास क्षणी आमिरला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आहेत.

अंबानी कुटुंबाची विशेष उपस्थिती

लग्नाच्या विधींसाठी येणाऱ्या पाहुण्यांमध्ये देशातील मोठे उद्योगपती अंबानी कुटुंबाने सर्वप्रथम हजेरी लावली. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसातही अंबानी कुटुंबाचा गाड्यांचा ताफा आमिर खान यांच्या बंगल्यावर पोहोचला. त्यांच्या आगमनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अंबानी कुटुंब आणि अमीर खान यांचे कौटुंबिक संबंध अतिशय जवळचे मानले जातात.

Maharashtra TimesAkanksha Chamola: लग्नाआधी स्त्रीयाचं आकर्षण, काही मुलींसोबत संबंध; गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाचा आणखी एक खळबळजनक खुलासा
तर अंबानी कुटुंब आमिरच्या लग्नाला पोहोचत असतानाच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर झाड कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ताफा काही काळ थांबवण्यात आला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, या पावसाचा लग्नाच्या तयारीवर कोणताही परिणाम झालेला नाही. रेनकोट घातलेले कर्मचारी आणि डेकोरेटर्सनी आमिरच्या बंगल्याला आकर्षक दिव्यांनी आणि फुलांनी सजवलं आहे. कालपासूनच घरात पाहुण्यांसाठी आसनव्यवस्था आणि इतर लॉजिस्टिक तयारी पूर्ण करण्यात आली होती.

Maharashtra Times‘MPSC’ चं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा संघर्ष, अंजिक्य राऊतच्या मराठी सिनेमाची चर्चा, पहिल्यांदाच दिसला वेगळ्या भूमिकेत

या विवाह सोहळ्यासाठी केवळ ७० ते ८० अतिशय जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता, तसंच दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे देखील या सोहळ्याला पोहोचले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंही या सोहळ्यासाठी पोहोचले आहेत.

आमिर खान यांची बहीणही कालच त्यांच्या घरी पोहोचली होती. आज स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत दोघांचा नोंदणीकृत विवाह होणार असून, त्यानंतर एका खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या जेवणाचा मेनू अमीर आणि गौरी यांनी स्वतः मिळून तयार केला आहे.

Maharashtra TimesShruti Marathe: ‘प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, ते माझं पूर्ण झालं’, बॉलिवूडच्या आगामी सीरिजमध्ये झळकणार श्रुती मराठे, अशी झालेली निवड
दरम्यान, आमि खाननं गेल्या वर्षी त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गौरी स्प्रॅट सोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा प्रसारमाध्यमांसमोर केली होती. या नव्या सुरुवातीसाठी संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत