Headlines

आधी घटस्फोटाची घोषणा, मग महिलांसोबत संबंध असल्याचा खुलासा; गौरव खन्ना समोर येताच ‘लॉक अप २’ मध्ये ढसाढसा रडली आकांक्षा चामोला


Gaurav Khanna met Akanksha chamola in Lock Upp 2:हिंदी टेलिव्हिजन स्टार गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चामोला हे दोघेही सध्या चर्चेत आहे. आकांक्षा चामोला ही ‘लॉक अप २’ सहभागी झाली असून काही दिवसांपूर्वी तिनं खळहळजनक दावा केला होता. आता गौरव खन्ना तिच्या भेटीला आला आहे.

gaurav khanna and akanksha chamola in Lock Upp 2
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: ‘ लॉक अप २ ‘ हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आलाय. शो सुरू झाल्यापासूनच सेलिब्रिटींनी एक एक सिक्रेट शेअर करत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्यातही हिंदी टीव्ही इंडस्ट्रीचा स्टार गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चामोला ही स्पर्धक पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. प्रिमियरच्या दिवशीच तिनं गौरव आणि तिने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतरही तिने अनेक धक्कादायक दावे केले, पण आता खरा धक्का तिला मिळाला जेव्हा गौरवची शोमध्ये एन्ट्री झाली.

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस’चा माजी विजेता गौरव खन्नानं ‘लॉक अप २’ या शोमध्ये ‘स्पेशल व्हिजिटर’ म्हणून एन्ट्री घेतली आहे. गौरवची पत्नी आणि या शोची स्पर्धक आकांक्षा चामोला हिनं काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घटस्फोटाचा मोठा खुलासा केला होता, ज्यानंतर आता हे दोघे पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.

Maharashtra TimesArbaz Shaikh Post: ‘माझ्यासाठी विषय इथेच संपलाय’, हॉस्पिटलवर FDAने कारवाई केल्यानंतर अरबाज शेखचं वादावर स्पष्टीकरण
“तुने तो बँड बजा दी यार!”
तर शोच्या नवीन प्रोमोमध्ये जेलर फराह खान कैद्यांना भेटायला येणाऱ्या पहिल्या पाहुण्याची घोषणा करते. त्यानंतर गौरव खन्ना अतिशय फिल्मी आणि भावूक अंदाजात एक शायरी म्हणत जेलमध्ये प्रवेश करताना दिसतो.

प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की गौरवला पाहताच आकांक्षा चामोलाला भावुक झाली, तिला अश्रू आवरता आले नाहीत. गौरव थेट तिच्या सेलजवळ जातो आणि हसत हसत तिला म्हणतो की, “बँड बजा दी तुने मेरी”. गौरवला पाहून आकांक्षा रडताना दिसते. आता दोघांमध्ये आणखी संवाद होणार? घटस्फोट खरा की प्रमोशन स्टंट हे सगळं आता समोर येणार आहे.

दरम्यान,’लॉक अप २’ च्या पहिल्याच भागात आकांक्षा चामोलाने प्रेक्षकांना एक मोठा धक्का दिला होता. तिनं स्टेजवरच जाहीर केलं होतं की, ती आणि गौरव खन्ना गेल्या एका वर्षापासून वेगळे राहत असून लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.

मुलांबाबत मतभेद

आकांक्षानं शोमध्ये सांगितलं की, गौरवला मूल हवं आहे, परंतु तिच्यात आई होण्याची भावना नाही. याच कारणामुळं दोघांनी परस्पर संमतीनं वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. या खुलाशानंतरही गौरवनं जाहीरपणे आकांक्षाला पाठिंबा दिला होता. “ती माझी पत्नी आहे, माझं तिच्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे आणि मी तिला नेहमीच सपोर्ट करेन,” असं म्हटलं होतं.

Maharashtra TimesSai Ranade : अभिजीत खांडकेकरला गाडीच्या डिक्कीत लपवून बिल्डिंगमध्ये आणलेलं, सई रानडेने सांगितला किस्सा
महिलांसोबत संबंध
तर नुकत्याच दाखवण्यात आलेल्या एका एपिसोडमध्ये आकांक्षानं लग्नापूर्वी महिलाकडं आकर्षित व्हायची, काही महिलांसोबत तिचे संबंधही होते, असा खळबळजनक दावा तिनं केला होता.

हा तर टीआरपी स्टंट?
गौरव आणि आकांक्षाचा हा प्रोमो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या मते हा सगळा प्रकार केवळ शोच्या लोकप्रियतेसाठी आणि टीआरपी वाढवण्यासाठी रचलेला कट आहे.

पॅच-अपची शक्यता

काही चाहत्यांना वाटतंय की या भेटीनंतर दोघांमधील मतभेद मिटतील आणि त्यांचे पॅच-अप होईल.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा