Headlines

Om Bhutkar Wedding Photo Viral


Om Bhutkar Wedding Photo Viral:मराठी सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेता ओम भुतकर सध्या चर्चेत आला आहे. पण नेहमीच सिनेमे, हटके भूमिकांमुळे चर्चेत असणार ओम यावेळी मात्र वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.

Om Bhutkar Wedding
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरवात केली. अभिनेता निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांच्या लग्नाचीही बरीच चर्चा झाली. आता आणिखी एका अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ताकदीचा अभिनेता ओम भुतकर सध्या चर्चेत आला आहे. ‘मुळशी पॅटर्न’ फेम या अभिनेत्यानं गुपपूच लग्न उरकलं असून त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
ओम भुतकरचे नवरदेवाच्या वेशातील काही फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. डोक्यावर फेटा अन् गळ्यात वरमाला असलेले फोटो असून नवरीनं गुजराती साडी परिधान केल्याचं दिसत आहे.

जवळच्या मित्रानं शेअर केला फोटो
तर अभिनेता अभय महाजन यानेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ओमचा नवरदेवाच्या वेशातील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ओमं शेरवानी घातली असून आणि डोक्यावर फेटा परिधान केला आहे, त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू पाहायला मिळत आहे. तर आणखी एका फोटोत अभिनेता अलोक राजवाडे देखील दिसत आहे. अभयनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी काही फोटो शेअर केले आहेत

Maharashtra TimesPriyadarshini Indalkar: हॅरी पॉटर’, ‘बार्बी’, ‘बिग हिरो ६’, ‘फ्रोजन’ सारख्या प्रोजेक्टसाठी प्रियदर्शिनीनं केलंय काम, पहिल्या कमाईबद्दलही केला खुलासा
दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक पेजेवर ओम भुतकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले असले तरी, त्यानं स्वत:हून अधिकृतपणे लग्नाबद्दल सांगितलं नाहीये. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहते ओम ची लाइफ पार्टनर आहे तरी कोण? असा प्रश्न विचारत आहेत.

Maharashtra TimesAdhokshaj Karhade: बॉलिवूड अभिनेता मुलाचं नाव ‘तैमूर’ ठेऊ शकतो, मी माझ्या धर्मानुसार ‘अक्षोभ्य’ ठेवलं तर काय चुकलं? मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना अधोक्षजचं उत्तर
ओम भुतकरबद्दल बोलायचं झालं तर तो मराठी कलाविश्वातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि अत्यंत हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो.’ मुळशी पॅटर्न’मधील त्याची राहुलची भूमिका प्रचंड गाजली. याशिवाय त्यानं ‘रावरंभा’, ‘जिंदगी विराट’, ‘बारायण’, ‘नाळ’, ‘नाळ २’ ‘आता थांबायचं नाय’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ व ‘देऊळ बंद २’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसंच त्याच्या ‘सुखन’ या उर्दू गझल आणि शायरीच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची नेहमीच मोठी पसंती मिळते.

दरम्यान, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न २’ची घोषणा केल्यामुळे ओम पुन्हा एकदा त्या भागात दिसणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा