मुंबई : भारत आणि इंग्लंड मधील चौथ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाने ९ विकेटने विजय मिळवत मालिका ३-० ने खिशात घातली आहे. भारतीय संघाने आज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करत आपली पराभवाची हॅट्रिक पूर्ण केली. कॅप्टन श्रेयस अय्यरनेटॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १५८-७ धावाच करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने 14व्या ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करत आपला सलग तिसरा विजय साकारला. या विजयासह इंग्लंड संघाचे पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकली आहे. २०१९ नंतर भारताने टी-२० फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच सलग दोन मालिका गमावल्या आहेत.
सामन्याचा धावता आढावा
भारताकडून आज पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा सलामीला आले होते. दोघांनी थोडा सावध पवित्रा घेत आक्रमण केले. मात्र परत एकदा वैभव चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. या मालिकेत दुसऱ्यांदा जोफ्रा आर्चरने वैभवला (१५ धावा) आउट केले. त्यानंतर इतर फलंदाजही पुन्हा फेल गेले. अभिषेक शर्मा १६ धावा, ईशान किशन ४ धावा, शिवम दुबे २२ धावा, तिलक वर्मा ११ धावा करून आऊट झाले. श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत मैदानावर थांबत ८० धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. पण भारताने २० ओव्हरमध्ये १५८ धावा केल्या होत्या. एका फलंदाजाच्या 206 धावा, संघाच्या 417; टी-20 सामन्यात तब्बल 646 धावांचा पाऊस, षटकार तब्बल… इंग्लंडकडून सलामीला जोस बटलरला अर्शदीप सिंगने ८ धावांवर माघारी पाठवले होते. पहिला झटका दिल्यावर भारत सामन्यात कमबॅक करणार अशी सर्वांना आशा निर्माण झाली होती परंतु कॅप्टन हॅरी ब्रूकची ३५ चेंडूत नाबाद ७९ धावांची शानदार खेळी आणि फिल सॉल्टची ४२ चेंडूत नाबाद ५९ धावा करत सामना सहज जिंकवला. भारताकडून अर्शदीप सोडला तर एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा यांना काही खास कामगिरी करता आली नाही. INDvsENG : भारतासाठी करो या मरोचा सामना; पण पावसामुळे प्लॅन बिघडणार? ब्रिस्टलच्या हवामानाचा अंदाज काय सांगतो? दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने आता सलग तीन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र त्यानंतर सलग तीन सामन्यात इंग्लंडने भारतावर मात करत पहिल्यांदाच भारताविरूद्ध टी-२० मालिका जिंकली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा