लातूर जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळीचा फळबागांना मोठा फटका बसलाय. औसा, निलंगा, देवणी तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.अवकाळीमुळे आंबा आणि टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत असून नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.