Headlines

अर्जेंटिनावर दुहेरी संकट, प्रीमियर लीगपासून दूर ठेवले जाण्याची शक्यता; ‘फिफा’कडून कारवाईची चर्चा, कारण काय?


Argentina face action over Falklands banner : वर्ल्ड कप फुटबॉलच्या अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या अर्जेटिना खेळाडूंच्या यातना थांबण्यास तयार नाहीत. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर अर्जेटिनाच्या खेळाडूंनी माल्विनास (फॉकलैंड्ससाठी अर्जेटिनातील शब्द) आमचेच अशा अर्थाचा फलक फडकावला होता. त्यामुळे त्यांच्यावर प्रीमियर लीग बंदीचे सावट आहे. त्याच वेळी अर्जेटिनाच्या खेळाडूंनी अंतिम सामन्यानंतर केलेल्या गोंधळाचीही फिफाच्या शिस्तपालन समितीने चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे.

Argentina face action over Falklands banner
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फॉकलैंड्सबाबतचा फडकावण्यात लिसांद्रो मार्टिनेझ (मँचेस्टर युनायटेड), एंझो फर्नांडीस (एंझो फनाँडेस (चेल्सी), खिस्तियन रोमेरो (टॉटनहॅम हॉट्सपूर) हे आघाडीवर होते. या संघातील अनेक खेळाडू प्रीमियर लीगसाठी करारबद्ध आहेत. त्यांनी फलक झळकावल्यावर त्याचे प्रतिसाद इंग्लंडमध्ये उमटले होते. त्यातील काहींनी अर्जेंटिना खेळाडूंचा प्रीमियर लीगसाठी फलक आवश्यक असलेला वक व्हिसा रद्द करण्याची मागणी केली आहे.

आर्थिक अडथळा

प्रीमियर लीग बंदीचा निर्णय सोपा नसेल. लिसांद्रो मार्टिनेझ, खिस्तियन रोमेरो, लिसांड्रो मार्टिनेझ, मार्कोस सेनेसी, एंझो फाँडेस, अॅलेक्सी मॅक अॅलीस्टर हे प्रीमियर लीगमधील महागडे खेळाडू आहेत. ते एकूण २ कोटी ३० लाख पौंड कराचा भरणा प्रतिवर्षी करतात. फॉकलैंड्सवरील तावा राखण्यासाठीच्या एकूण खर्चाच्या ही रक्कम ३३ टक्के आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.
Maharashtra TimesFIFA World Cup Winner 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनची गतविजेत्या अर्जेंटिनावर 1-0ने मात, एम्बापे गोल्डन बूटचा मानकरी

अर्जेंटिनाच्या खेळाडूंना भांडण भोवणार?

अर्जेंटिना खेळाडूंनी अंतिम सामन्यानंतर केलेल्या वर्तनाची चौकशी ‘फिफा’कडून सुरू झाल्यामुळे अर्जेंटिना संघः तसेच त्यातील खेळाडूंवर मोठ्या कारवाईची शक्यता आहे. फिफाच्या शिस्तपालन समितीने घेतलेल्या निर्णयाची जागतिक स्तरावर अंमलबजावणी होते. त्यामुळे अर्जेंटिना खेळाडूंवर कठोर कारवाईचे संकट आहे. स्पेन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष लुईस रुआलेस यांनी स्पेन महिला संघातील खेळाडूचे चुंबन घेतल्यामुळे त्यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. इटलीचा बचावपटू जॉर्जिओ चिएलिनी याला वर्ल्ड कप लढतीदरम्यान खांद्याला चावल्यामुळे उरुग्वेच्या लुईस सुआरेझवर चार महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी व्यावसायिक सामन्यांसाठीही फुटबॉलमधील होती. अंतिम सामन्यानंतरच्या गोंधळाबद्दल अर्जेंटिना संघातील ४ खेळाडू प्रामुख्याने चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकतील. ही कारवाई करताना अर्जेंटिनाच्या संघाकडून यापूर्वी झालेले अवमानही लक्षात घेतले जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra TimesFIFA World Cup Winner 2026 : विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर

पराभवाच्या जखमा खोलवर : मेस्सी

‘वर्ल्ड कप अंतिम सामन्यातील पराभव कमालीचा वेदनादायक आहे. या जखमा लवकर भरून निघणार नाहीत,’ असे लिओनेल मेस्सीने सांगितले. त्याने समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या स्पर्धेत अर्जेंटिना सघास देशवासियांना दिलेला पाठिंबा, आमची कामगिरी कधीही विसरू शकणार नाही. आम्ही अभिमानास्पद कामगिरी केली याचे समाधान आहे, असे मेस्सीने नमूद केले आहे. त्याने या वेळी विजेत्या स्पेन संघाचेही आवर्जून अभिनंदन केले आहे.
Maharashtra TimesFIFA WC 2026 Final Prize Money : वर्ल्ड कप फायनल हरल्यावरही अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, तर विजेत्या स्पेनवरही पैशांचा पाऊस, किती मिळाले?

मेस्सी दावेदार होता…

  • गोल्डन बॉलसाठी मेस्सीच दावेदार असे त्याच्या कट्टर पाठीराख्यांचे मत.
  • मेस्सी यापूर्वी २०१४ आणि २०२२मध्ये या पुरस्काराचा विजेता
  • अर्जेटिनाच्या या स्पर्धेतील वाटचालीत मेस्सीचा मोलाचा सहभाग. इजिप्त आणि इंग्लंडविरुद्ध निर्णायक क्षणी मोलाची कामगिरी
  • इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही गोलमध्ये मेस्सीचे पास निर्णायक