Tharala Tar Mag Promo Update : प्रिया आणि महिपतने प्लॅनिंग करुन सायलीला खोट्या आरोपात अडकवलेलं असतं. त्यामुळे आता तिच्या सुटकेसाठी अर्जुन पेटून उठला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठरलं तर मग या मालिकेमध्ये लवकरच प्रेक्षकांना अपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन ने गेल्या तीन वर्षात प्रिया व महिपत गॅंगने घातलेला घोळ एक एक करून समोर आणला आणि त्यांना तुरुंगात टाकले. मात्र तरीही डोकं लावून महिपत शिखरे तुरुंगातून बाहेर पडला. नागराज आणि प्रिया अजूनही तुरुंगाची हवा खात आहेत पण त्यांच्या मधला सुडाचा राग हा काही शांत बसलेला नाही. थोडे दिवस महिपत बाबाची नाटक केल्यानंतर महिपत पुन्हा एकदा त्याच्या व्हिलन मोडमध्ये परत आलेला पाहायला मिळतोय. यावेळी या सगळ्यात या गॅंगला सचिन दीक्षितची साथ मिळत आहे.
प्रिया, सचिन, नागराज, राकेश आणि महिपत यांनी डोक लावून सायलीला खोट्या आरोपात बसवलं आणि तुरुंगात टाकलं आहे. या खुरापती लोकांच्या प्लॅनिंग पासून अनभिज्ञ असलेले सायली अर्जुन व सुभेदार आणि किल्लेदार मात्र हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या डोळ्यासमोर असलेली सायली मुलींची तस्करी कशी काय करू शकते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. शिवाय शत्रु पक्षांनी डोकं लावून असे काही पुरावे तयार केलेले असतात ज्यामुळे समाजात सुद्धा सायली विरोधात रोष पसरलेला असतो. सायलीने आश्रमाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच तिच्या विरोधात कारस्थान सुरू होतात आणि तिला मुलींच्या तस्करीत अटक होते. तिच्या डोळ्यात एकच सोनलला तिच्या घरी नेतोय असं सांगून किडनॅप केलं जातं. पुढे आश्रमातल्या इतर मुली सुद्धा किडनॅप होतात. हा सर्व प्रकार तिच्या डोहाळे जेवणाला घडल्यामुळे कोणाच्याच काहीच लक्षात येत नाही.
Satish Rajwade School Days : सतीश राजवाडेंनी शाळेत वॉशरुमच्या भिंतीवर लिहिलेले असे काही की शिक्षेच्या भीतीने स्पिकरच चोरला, कांड समोर आला पण आयुष्य बदललंTharala Tar Mag च्या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीला विचारतो की जेव्हा सोनल आश्रमात आलेली तेव्हा तिच्या वयाबद्दल तुमचं काही बोलणं झालं होतं का? यावर सायली सांगते की वडगावच्या जत्रेत जेव्हा आग लागली तेव्हा त्यादिवशी तिचा तिसरा वाढदिवस होता. ती जत्रा 2 मे 2008 ला होती. म्हणजे त्यावेळी ती तीन वर्षाची होती. तेव्हा अर्जुन त्याचं कॅल्क्युलेशन करून म्हणतो की म्हणजे आत्ता तिचं वय हे 21 असायला हवं. त्यांना एक महत्त्वाची कडी सापडते. सायलीसाठी जेव्हा बेल मागितली जाते तेव्हा अल्पवयीन मुलींची तस्करी हे कारण लिहून तिची बेल नाकारली जाते पण इथे सापडलेल्या वयाच्या गोंधळात त्यांना महत्त्वाचा पुरावा हाती लागलेला असतो ज्यामुळे सायलीची निदान जामीनावर सुटका होऊ शकणार असते.
हा प्रोमो पाहून प्रेक्षकही खुश झाले असून एकाने कमेंट केली आहे की, पुढे सगळं काही नीट होईल अशी आशा, अर्जुन सुभेदार इन ॲक्शन मोड! तो सायलीला सोडवला शिवाय राहणार नाही. तर एकाने म्हटले की हिला जेलमधून सोडवायला आता एक वर्ष लागेल.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा