वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कॅनडातील ओंटारियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड स्क्वॅश कनिष्ठ वैयक्तिक चॅम्पियनशिपमध्ये अनाहत सिंग आणि आर्यवीर दिवाण यांनी सहज विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिला गटातील अव्वल मानांकित अनाहतने 32 जणांच्या फेरीत हाँगकाँगच्या पुई यिन चोले लोचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. आता पुढील फेरीत तिचा सामना मलेशियाच्या डॉईस ये सॅन ली हिच्याशी होईल. दुसरीकडे आर्यवीरने दक्षिण आफ्रिकेच्या जोसेफ फीस्टवर सरळ गेम्समध्ये सहज मात केली आणि आता तो अमेरिकेच्या यासीन शलाबीचा सामना करेल. मात्र गुरवीर सिंग, युशा नफीस, सान्वी कलंकी, रुद्र सिंग आणि अनिका दुबे हे खेळाडू आपापल्या सामन्यांत उच्च मानांकन असलेल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडले.
निकाल : पुरूष आर्यवीर दिवाण विजयी विरुद्ध जोसेफ फीस्ट 11-4, 11-3, 11-3, अॅडम हवाल (इजिप्त) विजयी विरुद्ध गुरवीर सिंग 11-6, 11-8, 11-3,
निखिलेश्वर मोगनासुंदरम (मलेशिया) वि.वि. युशा नफीस 11-9, 11-7, 11-8
महिला : सवाना मॉक्सहॅम (बेल्जियम) वि.वि. सान्वी कलंकी 11-7, 11-4, 11-2, बार्ब सामेह (इजिप्त) वि.वि. रुद्र सिंग 11-5, 11-6, 11-1, त्झ चिंग चेउंग (हाँगकाँग) वि.वि. अनिका दुबे 11-6, 11-7, 11-5, अनाहत सिंग वि.वि. पुई यिन चोले लो (हाँगकाँग) 11-3, 11-1, 11-3.
