Headlines

संसदेत कंगनाचा ‘रॉयल’ अंदाज! निळी साडी, 35 लाखांची बॅग अन् रोलेक्सच्या घडाळ्यापर्यंत सगळंच चर्चेत – kangana ranaut looks stunning in blue saree steals the show with 35 lakh birkin and rolex


कंगना रनौतचा संसद परिसरातील निळ्या साडीतील लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.साडीला लक्झरी Hermès Birkin बॅग आणि Rolex Lady-Datejust घड्याळाची साथ देत तिने आपला अंदाज अधिक खास केला.@goatmenfashion च्या पोस्टनुसार, या बॅगची किंमत ₹35 लाख आणि घड्याळाची किंमत ₹21 लाख असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Kangana Ranaut blue saree parliament look
फोटो सौजन्य :- सर्व फोटो @ANI
बॉलिवूडमधून राजकारणात आलेली अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी तिच्या राजकीय वक्तव्यामुळे नव्हे, तर संसदेत दिसलेल्या तिच्या स्टायलिश आणि रॉयल लूकमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे. निळ्या रंगाची आकर्षक साडी, लक्झरी हँडबॅग आणि मनगटावरील Rolex घड्याळ अशा संपूर्ण लूकमध्ये कंगना संसद परिसरात दिसली. कंगनाचा हा लूक पाहताच फॅशनप्रेमींचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. पारंपरिक भारतीय साडीला लक्झरी अॅक्सेसरीजची जोड देत कंगनाने आपला लूक अगदी वेगळ्या पद्धतीने कॅरी केला. तिच्या साडीचा रंग, मिनिमल पण एलिगंट स्टाइल आणि महागड्या अॅक्सेसरीज यामुळे तिच्या लूकला ‘रॉयल टच’ मिळाला. (फोटो सौजन्य :- सर्व फोटो @ANI)

निळ्या साडीत कंगनाचा एलिगंट अंदाज

निळ्या साडीत कंगनाचा एलिगंट अंदाज

कंगनाने यावेळी पेल ब्लू रंगाची एरी सिल्क साडी नेसली होती. निळ्या रंगाच्या या साडीमध्ये तिचा लूक साधा असूनही अतिशय उठावदार दिसत होता. साडीला पारंपरिक अंदाज कायम ठेवत कंगनाने त्यासोबत योग्य अॅक्सेसरीजची निवड केली होती.या साडीचा सौम्य रंग आणि तिची स्टाइल यामुळे कंगनाचा संपूर्ण लूक क्लासी आणि सोफिस्टिकेटेड दिसत होता.संसदेसारख्या औपचारिक ठिकाणी पारंपरिक पोशाखाला प्राधान्य देत तिने आपल्या स्टाइलची वेगळी छापही सोडली. कंगनाच्या फॅशन स्टाइलमध्ये भारतीय संस्कृती आणि आधुनिक लक्झरी यांचा मेळ अनेकदा पाहायला मिळतो. यावेळीही तिच्या संसद परिसरातील लूकमध्ये हेच पाहायला मिळाले.

हँडबॅगची चर्चा

हँडबॅगची चर्चा

कंगनाच्या या लूकमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती तिची हँडबॅग. रिपोर्ट्सनुसार, कंगनाच्या हातात Hermès Birkin बॅग दिसली. या लक्झरी बॅगच्या मॉडेल्सच्या किमती मोठ्या प्रमाणात बदलत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर आणि विविध रिपोर्ट्समध्ये तिच्या बॅगच्या किमतीबाबत वेगवेगळे दावे पाहायला मिळत आहेत.@goatmenfashion या Instagram पेजने शेअर केलेल्या पोस्टनुसार, कंगनाच्या हातातील Hermès Birkin बॅगची किंमत ₹35 लाख, तर Rolex Lady-Datejust घड्याळाची किंमत ₹21 लाख असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे तिच्या किमतीपेक्षा कंगनाने निवडलेल्या लक्झरी ब्रँडमुळे तिचा लूक चर्चेत आला, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. Hermès Birkin ही जगभरातील प्रसिद्ध लक्झरी हँडबॅग्सपैकी एक मानली जाते. तिच्या विविध मॉडेल्स, मटेरियल, आकार आणि डिझाइननुसार किंमतीत मोठा फरक असू शकतो. त्यामुळे केवळ फोटो पाहून एखाद्या बॅगची अचूक किंमत सांगणे शक्य नसते.

संसदेतही कंगनाची फॅशन चर्चा

संसदेतही कंगनाची फॅशन चर्चा

कंगना रनौत सोशल मीडियावर तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी आधीपासूनच ओळखली जाते. अभिनय क्षेत्रात असताना तिच्या वेगवेगळ्या लूकची चर्चा होत असे. आता राजकारणात सक्रिय झाल्यानंतर संसदेतही तिचे फॅशन लूक अनेकदा चर्चेत येतात.यावेळी निळ्या साडीतील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते तिच्या स्टाइलचे कौतुक करताना दिसत आहेत. काही जणांनी तिच्या साडीच्या पारंपरिक लूकचे कौतुक केले, तर काहींचे लक्ष तिच्या लक्झरी अॅक्सेसरीजकडे गेले.

कंगना रनौतचा संसदेत निळ्या साडीतील रॉयल लूक

‘रॉयल’ लूकची सोशल मीडियावर चर्चा

‘रॉयल’ लूकची सोशल मीडियावर चर्चा

कंगनाच्या या लूकचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या स्टाइलची चर्चा सुरू झाली. निळी साडी, व्यवस्थित स्टाइल केलेले केस, साडीला साजेशा अॅक्सेसरीज आणि लक्झरी बॅग-घड्याळ यामुळे तिचा लूक अनेकांच्या पसंतीस उतरला.विशेष म्हणजे कंगनाच्या फॅशनमध्ये नेहमीच पारंपरिक भारतीय पोशाखांना महत्त्व दिले जाते. साडी, शाल किंवा इतर भारतीय पोशाखांमध्ये ती अनेकदा दिसते. मात्र, या पारंपरिक लूकला ती आधुनिक आणि लक्झरी अॅक्सेसरीजची जोड देते. त्यामुळे तिची स्टाइल इतरांपेक्षा वेगळी ठरते.

कंगनाचा साधा पण स्टायलिश अंदाज

कंगनाचा साधा पण स्टायलिश अंदाज

कंगना रनौतने आपल्या लूकमध्ये साधेपणा आणि स्टाइलचा सुंदर मेळ साधला होता. पेल ब्लू रंगाची साडी, सोज्वळ मेकअप आणि साध्या अॅक्सेसरीजमध्ये तिचा लूक एलिगंट दिसत होता.तिच्या या साध्या पण क्लासी लूकने संसद परिसरात उपस्थितांचे तसेच सोशल मीडियावरील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा