Sanjay Manjrekar On Vaibhav & Jaiswal : भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आयसीसीकडे वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमकं काय कारण? जाणून घ्या.
Sanjay Manjrekar Jay Shah(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दुसरा कसोटी सामना सुरू आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत १-०ने आघाडी घेतलीय. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. यादरम्यान भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी भारताचा उगवता तारा असलेल्या वैभव सूर्यवंशी आणि सलामीवीर यशस्वी जयस्वाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजय मांजरेकर यांनी एक्स पोस्ट करताना आयसीसी आणि बीसीसीआयला टॅग केले आहे. पण मांजरेकर यांंनी कारवाई करण्याची मागणी का केली? जाणून घ्या.
आयसीसी आणि बीसीसीआय वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या वर्तनाकडे तुम्ही वारंवार दुर्लक्ष करून त्यांना मोकळं सोडलंत, तर त्यांच्या मनात हे वर्तन योग्य असल्याची भावना निर्माण होईल आणि ते पुन्हा असंच वागतील. हे क्रिकेटसाठी चांगलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठीही चांगलं नाही, असं संजय मांजरेकर म्हणाले आहेत. संजय यांच्या एक्स पोस्टची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Imran Khan : ‘इम्रान खान यांना एका डोळ्याने कमी दिसतं, खिडकी नसलेली कोठडी’; मुलाचे खळबळजनक दावे, काय म्हणाला? श्रीलंकेमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेसाठी वैभव सूर्यवंशी याची भारत अ संघात निवड झाली होती निवड झाली होती. तेव्हा एक सामना वादग्रस्त ठरला होता. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात वैभव हा धावा करण्यात अपयशी ठरला होता. ज्यावेळी तो आऊट झाला तेव्हा माघारी जात असताना श्रीलंकेचा खेळाडू त्याला काहीतरी बोलला, तेव्ह वैभव त्याला जाऊन थेट भिडला होता. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. तर आता यशस्वी जयस्वालचे दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो याच्यासोबत वाद झाला. तेव्हा यशस्वीला आऊट केल्यावर माघारी जात असताना त्याला भिडलेला. दोघेही एकमेकांवर धावून गेले होते. श्रीलंका संघाच्या खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता.
Divya Mahajan : अभिमानास्पद! नाशिकच्या 16 वर्षाच्या दिव्याने नॉर्थ चॅनेलची ४० किमी खाडी पार करत रचला इतिहास, किती वेळ लागला?आयसीसीने यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यावर कारवाई केली होती. दोघांची २५ टक्के मॅच फी आणि १ डिमेरिट पॉइंट देण्यात आला होता. याचाच धागा पकडत संज मांजरेकरांनी आयसीसी आणि बीसीसीआयला कारवाई करण्याची मागणी केलीय. यशस्वी जयस्वाल ज्या प्रकारे वागला होता त्यावरून अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली होती. समालोचक हर्षा भोगले यांनी केलेल्या टीकेला तर यशस्वीने आपल्या इन्स्टा अकांऊटवरून रिप्लाय केला होता. आता आयसीसी आणि बीसीसीआय यावरून काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा