सावंतवाडी प्रतिनिधी : सह्याद्री पट्ट्याचे तरुण तडफदार युवा नेतृत्व दिनेश गावडे हे राजकारणी नसू़न समाजकारणी आहेत. त्यांनी गेल्या नऊ वर्षात विविध क्षेत्रात समाजपयोगी उपक्रम राबविले असून गोरगरिबांची ही सेवा केली आहे. या लोकसेवेतून त्यांनी सर्वांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांचे भवितव्य उज्वल असून शिवसेना त्यांच्या सदैव पाठीशी आहे. अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.
शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस बुधवारी रात्री आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, युवा तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडीस, सांगेली माजी उपसरपंच रमाकांत राऊळ, वामन नार्वेकर,
आनंद वरक, संजय गावडे, सातुळी बावळाट उपसरपंच स्वप्नील परब, नंदू गावडे, बबन गावडे, यश गावडे, परेश सोंसुरकर, देव्रत राऊळ, सचिन साटेलकर, आंबोली माजी सरपंच जगन्नाथ गावडे, सुनिल नार्वेकर, दादा नाटलेकर, आंनद गावडे, बबन गावडे, यश गावडे, देवरथ राऊळ आदींसह शिवसेना तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे यांनीही दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक केले. यावेळी दिनेश गावडे यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानून सर्वांच्या सहकार्याने यापुढेही समाजकार्यात कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
