Headlines

Maharashtra Rainfall : 3 दिवसात चित्र बददलं, IMD Report पावसाची तूट कमी, अनेक जिल्ह्यांना दिलासा – maharashtra monsoon rainfall report imd heavy rains monsoon deficit july 2026


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#Forecast #RainAlert #WeatherUpdate #WeatherForecast #MaharashtraWeatherUpdateभारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवसांसाठी दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. तर, केरळमधील 14 पैकी 11 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित 3 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या देखील केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या ओडीशातील पूरस्थिती बघितली तर, महानदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने राज्यात गंभीर स्थिती आहे. सध्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकुड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत. राज्यातील पावसाचा आपण आढावा घेतला तर, भारतीय हवामान विभागाचा एक अहवाल समोर आलाय ज्यात मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून 30 जुलैपर्यंत राज्यात आतापर्यंत किती पाऊस झाला हे समोरं आलं आहे. ज्यात राज्यातील तीनच जिल्हे असे आहेत जिथे जास्तीचा पाऊस कोसळला आहे. कालपासून जरी अनेक भागात पाऊस पडत असला तरी हंगाम सुरू झाल्यापासून एकूण पडलेला पाऊस हा चिंताजनक होता. मात्र दुसरीकडे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं चांगलीच जादू केली असून राज्यातील पावसाचं एकूण चित्र बदलून टाकलंय. तेव्हा राज्यात आतापर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी काय सांगतीय, दोन दिवसांपूर्वी सर्वाधिक पावसाचा तुटवटा असणारे मराठवाड्यासह इतर जिल्हे कोणते होते, राज्यातील पावसाचा मागील आठवड्यातील आणि आजचा आलेख काय सांगतोय आणि मागील महिन्याच्या तुलनेत देशातील पावसाची तूट किती आहे हेच आपण पाहणार आहोत.The India Meteorological Department (IMD) has forecast heavy rainfall over northern states, including Delhi and Haryana, for the next two days. In Kerala, 11 of the 14 districts are under an Orange Alert for very heavy rainfall today, while the remaining three districts are under a Yellow Alert. Nine districts will continue under an Orange Alert tomorrow. Meanwhile, Odisha remains on flood alert as the Mahanadi River continues to rise, prompting the opening of two gates of the Hirakud Dam. In Maharashtra, the latest IMD rainfall data up to July 30 shows that only three districts have recorded excess rainfall so far this monsoon. However, widespread rains over the past two to three days have significantly improved the state’s overall rainfall situation. In this report, we examine Maharashtra’s latest rainfall statistics, how the recent rains changed the deficit, which regions were worst affected just days ago, and how the state’s rainfall compares with the national monsoon trend.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत