Headlines

kkr new captain options after ajinkya rahane retirement hardik pandya suryakumar yadav; श्रेयस अय्यरनंतर रहाणेने सोडली साथ! आता गंभीरच्या जुन्या संघात सूर्याचे पुनरागमन होणार की हार्दिक बाजी मारणार?


KKR New Captain Options : अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर कोलकाता नाईट रायडर्ससमोर नव्या कर्णधाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, केएल राहुलसह पाच खेळाडूंची नावं चर्चेत आहेत.

KKR New Captain
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला (KKR) आता नवीन कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. २०२४ मध्ये श्रेयस अय्यरने केकेआरला चॅम्पियन बनवले होते. पण त्यानंतरच्या दोन मोसमांत संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. अशा स्थितीत पुढील मोसमासाठी KKR चे कर्णधारपद सांभाळू शकणाऱ्या ५ खेळाडूंची नावे चर्चेत आली आहेत.

हार्दिक पांड्या

जर KKR ला एखाद्या अनुभवी आणि आक्रमक कर्णधाराची गरज असेल, तर मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेड करणे मास्टरस्ट्रोक ठरू शकते. हार्दिकने २०२२ मध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले होते आणि २०२३ मध्ये फायनलमध्ये पोहोचवले होते. मुंबई इंडियन्ससोबत त्याचे संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत. त्यामुळे KKR त्याला आपल्या संघात समाविष्ट करून थेट कर्णधारपद सोपवू शकते.

रिंकू सिंग

बाहेरून खेळाडू आणण्याऐवजी संघातूनच नवा कर्णधार निवडायचा झाल्यास रिंकू सिंग हे पहिले नाव असेल. २०२६ च्या मोसमात रहाणेसोबत उपकर्णधार म्हणून त्याने काम पाहिले आहे. रिंकू KKR चा सर्वात भरवशाचा खेळाडू मानला जातो. फिनिशर म्हणून करिअर सुरू करणारा रिंकू आता संघाचा महत्त्वाचा चेहरा बनला आहे.

Maharashtra TimesAlzarri Joseph vs Daren Sammy : हेड कोच खोटं बोलतोय! वेस्ट इंडिज क्रिकेटमधील वाद चव्हाट्यावर, डॅरेन सॅमीला अल्झारीचा कडक रिप्लाय, नेमकं प्रकरण काय?

के. एल. राहुल

दिल्ली कॅपिटल्सनंतर के. एल. राहुल जर ट्रेड मार्केटमध्ये आला, तर KKR त्याच्यावर नक्कीच विचार करेल. KKR च्या मॅनेजमेंटमधील अभिषेक नायर यांच्यासोबत राहुलचे मैत्रीचे संबंध आहेत. याशिवाय पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केल्यामुळे राहुलकडे आयपीएलमधील कप्तानीचा मोठा अनुभव आहे.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला आहे. मुंबई इंडियन्समध्ये त्याला कर्णधारपदाची संधी मिळताना दिसत नाही. त्यामुळे तो संघ प्रशासनावर नाराज असल्याच्या बातम्या आहेत. KKR च्या माध्यमातून सूर्याचे जुन्या संघात पुनरागमन होऊ शकते. त्याने आपल्या आयपीएल करिअरची खरी सुरुवात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली KKR मधूनच केली होती.

Maharashtra TimesAjinkya Rahane News : 20 वर्षांचा प्रवास, निवृत्तीआधीचा प्रसंग, अजिंक्यच्या पत्नीनं इमोशनल पोस्टमधून मन मोकळं केलं, प्रत्येक शब्द बोलका!

सुनील नरेन

जर वरील चार खेळाडूंपैकी कोणाचेही नाव पक्के झाले नाही, तर KKR चा अनुभवी खेळाडू सुनील नरेन याच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. तो बऱ्याच वर्षांपासून या फ्रँचायझीशी जोडलेला आहे. मात्र, त्याला कर्णधार बनवण्याची शक्यता सर्वात कमी मानली जात आहे. अंतिम पर्याय उरला नाही तरच KKR हा निर्णय घेऊ शकते.