![]()
उद्धव ठाकरे यांनी प्रथम आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा म्हणत राऊत यांच्या ‘राम रक्षा आंदोलन’ महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या दाव्यावर बन यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राबाहेर विस्ताराच्या घोषणा करण्यापेक्षा पक्षातील संघटनात्मक आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात घरातून कारभार केला आता प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर हा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केला जात आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी सांगितलेली म्हाताऱ्याची कथा ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी तंतोतंत लागू होते. मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा त्याग केला, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि शेवटी त्यांच्या हाती काहीच लागले नाही.या राजकीय निर्णयांमुळे पक्षातील खासदार, आमदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर दूर गेले असून पक्षाची मोठी हानी झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या राजकारणाचा परिणाम म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केवळ राजकीय नुकसानच उरले आहे. पक्षरक्षा, आमदाररक्षा आंदोलन करा नवनाथ बन म्हणाले की, राम मंदिराशी संबंधित प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाईल, भारतीय जनता पक्षाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करण्याऐवजी स्वतःच्या राजकीय इतिहासाचा आढावा घ्यावा. रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा पक्षरक्षा, आमदाररक्षा आणि उद्धवजी रक्षा आंदोलन करा, त्याचीच तुम्हाला अधिक गरज आहे. तसेच राम मंदिराचा हिशोब मागण्यापूर्वी आपल्या कारभाराचा हिशोब द्यावा. सीतामातेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही नवनाथ बन म्हणाले की, प्रभू श्रीराम आणि सीतामातेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. ज्या काँग्रेसने प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले, त्याच काँग्रेससोबत राजकीय भूमिका घेतल्यानंतर रामभक्तीचा आव आणणे योग्य नाही. राऊत सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतात, महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे हे राजकारण वारंवार नाकारले आहे,येणाऱ्या काळातही जनता अशाच प्रकारे योग्य निर्णय देईल. राऊतांनी महाभारतातील पात्रांचा उल्लेख करून राजकीय टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे. इतिहासाचा आधार घेऊन आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय कारभाराचे आत्मपरीक्षण करावे, असे म्हटले. महाराष्ट्राच्या विकास, प्रशासन आणि आर्थिक व्यवहारांबाबत विरोधकांनी आधी स्वतःच्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाव घेणाऱ्यांनी त्यांच्या आदर्शांनुसार वर्तन करावे, असे सांगत त्यांनी हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर राजकारण केल्याचा आरोप विरोधकांवर केला. जनतेसमोर तथ्यांसह भूमिका मांडावी. हे ही वृत्त वाचा राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?:मंदिरातून लुटलेला पैसा सत्ताधाऱ्यांना अन् त्यांच्या मुलाबाळांना पचणार नाही- संजय राऊत
मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकासाठी (डिलिमिटेशन बिल) आवश्यक असलेला बहुमताचा आकडा भाजप सरकार कितीही पक्ष आणि खासदार फोडले तरी गोळा करू शकत नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर भाजपच्याच लोकांनी मोठी लूट केली असून, या कथित घोटाळ्याविरोधात आजपासून शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर
Source link
रामरक्षा' नव्हे, आधी ‘पक्षरक्षा’ अन् ‘आमदाररक्षा’ आंदोलन करा:टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्याची गोष्ट उद्धव ठाकरेंनाच तंतोतंत लागू होते; भाजपचा राऊतांना टोला
