Raigad Rain Update News Red Alert : या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित ठिकाणी तातडीने पूल उभारण्यात यावा तसेच रस्त्याच्या दुतर्फा मजबूत गटारे बांधून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात रस्ता पूर्णपणे खचण्याची आणि शेतीचे आणखी मोठे नुकसान होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा
सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ठाणे पाटबंधारे मंडळाच्या आज रविवारी सकाळी ८ वाजताच्या अहवालानुसार नागोठणे येथील अंबा नदी आणि कोलाड परिसरातील कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली, तर लोहप येथील पाताळगंगा नदी इशारा पातळीच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून पुढील तीन तास अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Pune Rain News : राज्यात पावसाचं थैमान! पुणेकरांनो घराबाहेर निघताना जपून, शहरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचं इशाऱ्यासह मोठं आवाहन
नागोठणे येथील अंबा नदीची पाणीपातळी ९.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून ती ९.०० मीटरच्या धोका पातळीपेक्षा अधिक आहे. या परिसरात १५२ मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान ५७० मिमीवर पोहोचले आहे. तर कोलाडजवळील डोलवहाल येथील कुंडलिका नदीची पाणीपातळी २४.०० मीटर झाली असून तिने २३.९५ मीटरची धोका पातळी ओलांडली आहे. येथे १३० मिमी पाऊस पडला असून एकूण पर्जन्यमान ७०८ मिमी इतके नोंदविण्यात आले आहे.
पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता
लोहप येथील पाताळगंगा नदीची पाणीपातळी २१.४० मीटर इतकी असून ती २०.५० मीटरच्या इशारा पातळीपेक्षा वर आहे. या परिसरात २५० मिमी पाऊस पडल्याने प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. महाड येथील सावित्री नदीची पाणीपातळी सध्या ४.६० मीटर असून ती इशारा पातळीच्या खाली असली, तरी वरच्या भागातील मुसळधार पावसामुळे तिच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Pune Police Raid: पुणे पोलीस आणि FDA कडून भेसळखोरांचं मोठं रॅकेट उघड, १३ जणांना बेड्या; १ हजार लिटर दुधात ५०० लिटर शाम्पू-केमिकलचे दूध!
दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचणे, ओढे-नाले दुथडी भरून वाहणे आणि काही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच एखादी नदी इशारा किंवा धोका पातळी ओलांडल्यानंतर तिच्या पाणीपातळीचा अहवाल प्रत्येक तासाला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पाटबंधारे मंडळाने दिली आहे.
सहानगोठीतील रस्ता पुन्हा धोक्यात
अलिबाग तालुक्यातील सहानगोठी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेली साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहतुकीसह शेतीच्या कामांनाही अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही समस्या वारंवार उद्भवत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Raj Thackeray: तुम्ही काहीच बोलत नाही, तुमच्या मौनामुळे ते अधिकच बेफाम होतायत; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले!
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डोंगरावरील माती, दगड आणि झाडाझुडपांचा कचरा पावसाच्या पाण्यासोबत खाली येऊन रस्त्यावर साचतो. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडतो आणि संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहू लागते. यामुळे रस्त्याची साईडपट्टी खचून रस्ता धोकादायक बनला आहे. या परिस्थितीचा फटका शेतीला बसत असून अनेक शेतांमध्ये गाळ आणि माती साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असतानाही पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या निर्माण होत असून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

