Jalna Rain News: पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था होताना दिसते. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तयार होताना दिसते. परंतु घनसावंगी तालुक्यातील एक गाव चिखलात रुतल अस म्हणायला हरकत नाही.

गाव गुडघाभर चिखलात रूतलेल्या अवस्थेत
पावसाळ्याच्या चार महिन्यांत राजूरकर कोठा (ता. घनसावंगी) हे गाव गुडघाभर चिखलात रूतलेल्या अवस्थेत असते. चिखलातून वाट काढून विद्यार्थी, गावकऱ्यांच्या हाल अपेष्टा वर्षानुवर्षे चिखलात रुतलेल्या आहेत.
मलेरिया डेंग्यू तापाची दर वर्षी साथ
कुंभार पिंपळगाव ते भादली या रस्त्यावर असलेल्या या गावाला जोडणारा एक किलोमीटरचा हा एकमेव रस्ता गुडघाभर चिखलाचा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर नद्या, डबकी, छोटी तळी आणि चिखलाचे चार महिने साम्राज्य पसरते. मलेरिया डेंग्यू तापाची दर वर्षी साथ या गावाच्या पाचवीला पुजलेली आहे.
चिमुकले विद्यार्थी चिखलातून वाट काढत शाळेत
चिमुकले विद्यार्थी चिखलातून वाट काढ शाळेत
गावात जिल्हा परिषदेची चौथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. चिमुकले विद्यार्थी याच चिखलातून वाट काढून शाळेत जातात. शाळेत हात पाय धुवून वर्गात बसतात. अनेकदा चिखलातून पाय घसरून पडतात. मग, शाळेत पालक दुसरे कपडे आणून देतात, अशी भयानक अवस्था आहे.
ग्रामस्थांचे जनजीवन चार महिन्यांत पूर्ण विस्कळीत होते.
ग्रामस्थांचे जनजीवन पावसाळ्याच्या चार महिन्यांत पूर्ण विस्कळीत होते. आजारी वयोवृद्ध ग्रामस्थांना चार जणांना उचलून झोळीत घालून न्यावे लागते. अनेकदा विद्यार्थ्यांना असेच झोळीतून शाळेत नेऊन सोडायचे आणि शाळा सुटल्यावर घरी आणायचे असा दैनंदिन उपक्रम चालतो.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमची हीच परिस्थिती आहे. आमदार, खासदार मते मागायला गावात येतात. गोड गोड बोलून पोकळ आश्वासने देतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश बहीर यांनी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांच आमरण उपोषण
‘वयोवृद्ध ग्रामस्थचिखलामुळे आणि रस्त्यामुळे खूप अस्वस्थ आहेत. शेकडो वेळा निवेदने दिली. मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या पायरीवर बसून राहिलो. पण, काही उपयोग झाला नाही. आता येत्या स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व गावकरी आमरण उपोषणाला बसणार आहेत,’ अशी माहिती ग्रामस्थ शरद बहीर यांनी दिली आहे.

